मी फाटक्यांना मदत केली…लवासासारखे प्रकल्प उभारले नाही, सत्तांरांनी थेट पवारांनाच पुढे ठेवलं

अब्दुल सत्तार यांनी लवासा प्रकल्पाचे नाव पुढं करून त्यांनी पवार कुटुंबीयांना टोला लगावला आहे. लवासा प्रकल्पावरून पवार कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले होते.

मी फाटक्यांना मदत केली...लवासासारखे प्रकल्प उभारले नाही, सत्तांरांनी थेट पवारांनाच पुढे ठेवलं
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 8:55 PM

नागपूरः वाशिममधील गायरान जमिनीच्या घोटाळ्यावरून विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केलीह होती. त्यातच आज हिवाळी अधिवेशनचा शेवटचा दिवस असल्याने विरोधकांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल चढविला. हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेच त्याचबरोबर त्यांनी जाता जाता पवार कुटुंबीयांवरही त्यांनी निशाणा साधला.

वाशिममधील 37 एकर गायरान जमिनीच्या वाटपावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्या आरोपांवरून मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाना उत्तर दिले आहे.

ते म्हणाले की, मी फाटक्यांना मदत केली आहे. मी गोरगरीबांना मदत केली असून लवासासारखे तर मी प्रकल्प उभा केले नाहीत असा टोला त्यांनी पवार कुटुंबीयांना लगावला आहे. लवासासारखे प्रकल्प उभा केले नाहीत, असं म्हणताच त्यानी ही राजकीय टीकाही नाही असंही त्यांनी म्हटले आहे.

गायरान जमिनीच्या वादावर बोलताना ते म्हणाले की, मी गरीब आणि फाटक्यांना मदत केली आहे. तर काहींनी एक एक रुपये देऊन, अगदी नाममात्र पैसे देऊन शंभर पासून ते अगदी पाचशे एकरपर्यंत जमिनी घेतल्या असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मी ज्या गरीबांना जमीन दिली आहे, त्याचा मला काही पश्चातापही होत नाही असा टोलाही त्यांनी लगावला नाही.

अब्दुल सत्तार यांनी लवासा प्रकल्पाचे नाव पुढं करून त्यांनी पवार कुटुंबीयांना टोला लगावला आहे. लवासा प्रकल्पावरून पवार कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी लवासा प्रकल्पाचा उल्लेख करून त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.