“कर्नाटक सरकारला अधिकृतरित्या कळवून दौरा करणार”; ‘हे’ मंत्री सीमाभागातील मराठी भाषिकांची परिस्थिती जाणून घेणार

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने चिथावणी देणारी वक्तव्यं केली जात असून, वादग्रस्त ट्विटही केली जात आहेत.

कर्नाटक सरकारला अधिकृतरित्या कळवून दौरा करणार; 'हे' मंत्री सीमाभागातील मराठी भाषिकांची परिस्थिती जाणून घेणार
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 8:32 PM

नागपूरः ज्या प्रमाणे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्याच प्रमाणे कर्नाटकमध्येही अधिवेशन सुरू आहे. बेळगावमध्ये सुरू असणाऱ्या हिवाळी अधिवेशनाआधी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर बैठक झाली होती. त्या बैठकीत सीमावादावर चर्चा होऊन त्यावर सामोपचाराने तोडगा काढण्याचेही संकेत देण्यात आले होते. तरीही बसवराज बोम्मई यांनी त्या बैठकीनंतर बोम्मई यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या भावना दुखवणारी,चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील मंत्री शंभूराज देसाई, मंत्री चंद्रकांत पाटील हे दोन्ही मंत्री कर्नाटक सरकारला अधिकृतरित्या कळवून बेळगाव दौरा करणार आहेत.

त्यावेळी बेळगावमध्ये राहणाऱ्या आणि सीमाभागातील नागरिकांची दुःख, कर्नाटक सरकारकडून केला जाणार अन्याय, अत्याचार, बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांची शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील भेट घेणार आहेत.

शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपण दोघंही बेळगाव दौरा करणार आहे.

यावेळी बेळगावमधील मराठी भाषिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना समाजून घेणार आहोत. हा दौरा करताना कार्यालयीन पद्धतीने कर्नाटक सरकारला माहिती देऊनच हा दौरा केला जाणार आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सातत्याने चिथावणी देणारी वक्तव्यं केली जात असून, वादग्रस्त ट्विटही केली जात आहेत.

त्यामुळे या विषयावर आणि सीमावादाविषयी मराठी भाषिकांची भूमिका मांडण्यासाठी ते कर्नाटक सरकारमधील मंत्र्याचीही भेट घेणार आहेत.

बेळगाव आणि सीमाभागातील वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत. त्यांचे जे पदाधिकारी आहेत. मराठी भाषिक आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती, त्यांचे पदाधिकारी आणि आजी माजी लोकप्रतिनिधी यांची भेट घेऊन त्यांची नेमकी काय भूमिका आहे. ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बेळगाव प्रशासनाकडून महाराष्ट्रातील मंत्री, नेत्यांना बेळगाव प्रवेश बंदी घालण्यात आली होती. पण आता मात्र कार्यालयीन पद्धतीने मुख्यमंत्री कार्यालयाला कळवूनच महाराष्ट्रातील दोन मंत्री सीमाभागाचा दौरा करणार असल्याने सीमाभागातील नागरिकांना आता उत्सुकता लागली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.