“सीमाभागातील 865 गावांसाठी जे-जे करता येईल ते-ते शिंदे फडणवीस सरकार करणार”; मराठी भाषिकांना न्याय देण्याचा ‘या’ मंत्र्यांना विश्वास
आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत, त्याआधी आम्ही एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत हे आधी संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे असा थेट त्यांनी त्यांना इशारा दिला आहे.
नागपूरः कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज नवनवी चिथावणी देत आहेत, आणि आमचे मुख्यमंत्री शेपूट घालून शांत बसतात. सीमावादावरून असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून आता मंत्री शंभूराज देसाई यांनी समाचार घेतला आहे. खासदार संजय राऊत यांनी अशी वक्तव्य केली असली तरी त्यांना जास्त महत्व देऊ नका अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे.
सीमावादावर जे संजय राऊत बोलतात ते कधी रस्त्यावर उतरले आहेत का? त्यांनी कधी लाठ्या खाल्ल्या का, कधी आंदोलन करून त्यांनी कधी तुरुंगवास भोगला आहे का असे एक ना अनेक सवाल शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना केले आहेत.
खासदार संजय राऊत यांनी बसवराज बोम्मई यांच्या चिथावणीखोर वक्तव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केले होते. त्यावरून बोलताना शंभूराज देसाई यांनी त्यांना थेट इशाराच दिला आहे.
ते म्हणाले की, की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत, त्याआधी आम्ही एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहोत हे आधी संजय राऊत यांनी लक्षात ठेवावे असा थेट त्यांनी त्यांना इशारा दिला आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांबाबत आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. त्यामुळे सीमाभागातील 865 गावांसाठी जे जे करता येणार आहे.
ते ते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करणार आहेत. त्यामुळे संजय राऊत यांनी बेताल आणि चिथावणीखोर वक्तव्य करू नये असा इशाराही शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
सीमावाद ज्या प्रमाणे कर्नाटकामध्ये पेटला आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही आता श्रेयवादावरून हे प्रकरण तापले आहे. त्यामुळे ज्या प्रकारे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबाबत जे वक्तव्य केले आहे. तशी वक्तव्य त्यांनी करू नये असा इशाराही त्यांनी केली आहे.