“चिथावणीखोर भाषण करून आग भडकवू नये”; भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली कळकळीची विनंती

संभाजीनगरमध्ये होणाऱ्या सभेविषयी आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सभा घेण्यासाठी कोणताही आक्षेप असता कामा नये, मात्र त्याठिकाणी चिथावणीखोर भाषण करून आग भडकवू नये, आग क्षमणारी भाषण असेल तर त्याचे स्वागत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

चिथावणीखोर भाषण करून आग भडकवू नये; भाजप नेत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडे केली कळकळीची विनंती
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 6:08 PM

नागपूर : महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आहे. त्याआधीपासूनच ही सभा होणार की नाही. या सभेला परवानगी मिळणार की नाही असे सवाल उपस्थित केले जात होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा झाल्यानंतर या सभेला परवानगी मिळणार की नाही याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यावर आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले की,ही सभा घेण्याविषयी आणि न घेण्याविषयी आमचे काही दुमत नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी या सभेविषयी बोलताना सांगितले की, खुर्चीच्या प्रेमापोटी सरकार विरोधात आंदोलन व्हावे, दंगे भडकाण्यासाठी सभा होत असेल तर महाराष्ट्राचा जनतेने महाविकास आघाडीचा खरा चेहरा समजून घ्यावा असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नागपूरात बोलताना सांगितले की, सावरकर हा काही आजच्या काळातील राष्ट्रीय इश्यू नाही असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले होते.

त्यावर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्यवीर हे अनेज वीरांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या विचाराच्या मार्गावर अनेकांनी प्राणाची आहुती दिली असा इतिहास त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावरून त्यांना उत्तर दिला आहे.

तर त्यांनी याचवेळी राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. ज्यांनी भारतीय विद्यापीठात शिक्षणच घेतलं नाही, त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास माहिती असणे शक्य नाही.

राहुल गांधी म्हणतात मी स्वातंत्र्यवीर सावरकर नाही. आणि ते खरं आहे. तुम्ही होऊसुद्धा शकत नाही. कारण अंदमान निकोबारच्या कोठडीत एक तास काढू शकणार नाही. ज्यांना इतिहास माहीत नसेल अशा लोकांना जनतेने धडा शिकवण्याची गरज असल्याची टीका त्यांनी केला आहे.

धिरेंद्रकृष्ण महाराज यांच्या वक्तव्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, हेट स्पीच करण्याचा कोणालाच अधिकार नाही. मात्र तो कोणत्याही समाजाचा, जातीचा, पंथाचा, धर्माचा रंगाचा उंचीचा असो कायद्याच्या चौकटीत, त्या हेट स्पीचचा अभ्यास केला पाहिजे, त्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे असा इशारा त्यांनी धिरेंद्र महाराज आणि बागेश्वर महाराज यांच्यासारख्या वक्तव्या करणाऱ्या महाराजांवर कारवाई केली पाहिजे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

तर संभाजीनगरमध्ये होणाऱ्या सभेविषयी आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सभा घेण्यासाठी कोणताही आक्षेप असता कामा नये, मात्र त्याठिकाणी चिथावणीखोर भाषण करून आग भडकवू नये, आग क्षमणारी भाषण असेल तर त्याचे स्वागत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.