मौद्यात रात्री दोन वाजता अवैध दारूचा अड्डा, आमदार टेकचंद सावरकरांची धाड, ठाणेदार गेले कुठे?
मौदा पोलीस ठाण्याचे पोलीस अवैध धंद्यांकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली. ठाणेदार खराबे यांना निलंबित करा, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.
नागपूर : मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री दोन वाजता अवैध दारूचा अड्डा सुरू होता. याची माहिती ठाणेदार खराबे यांना दिली. पण, त्यांनी कोणतीही अॅक्शन घेतली नाही. त्यामुळं आमदार टेकचंद सावरकर यांनी या दारूच्या अड्ड्यावर धाड टाकल्याचं सांगितलं.
मौदा पोलीस ठाण्याचे पोलीस अवैध धंद्यांकडे कानाडोळा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार सावरकर यांनी केली. ठाणेदार खराबे यांना निलंबित करा, अशी मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे.
रात्री दोन वाजता केला फेसबूक लाईव्ह
मौद्यात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती आमदार सावरकर यांना मिळाली. त्यांनी ती माहिती ठाणेदार खराबे यांना दिली. परंतु, त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळं ही आमदार टेकचंद सावरकर यांना ही कारवाई करावी लागली. यासंदर्भात त्यांनी रात्री दोन वाजता घटनास्थळावरून फेसबूक लाईव्ह केला.
मौद्याच्या ठाणेदाराला निलंबित करण्याची मागणी
यावेळी आमदार टेकचंद सावरकर आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बरेचदा ठाणेदार खराबे यांना सांगूनही कारवाई होत नसल्यानं नाईट ड्रेसवर आमदार सावरकर घराबाहेर पडले. त्यांनी मौद्याजवळच्या गब्बा नावाच्या ढाब्यावर रात्री दोन वाजता धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी दारू विक्री सुरू होती. तसेच ढाबा मालकाच्या कारमध्येही मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा आढळला. आमदारांना पाहून मद्यपी पळाले. मद्याचा साठा असलेली गाडी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची असल्याची शंका सावरकर यांनी व्यक्त केली.