“ईडी असो सीबीआय असो, ही कारवाई कुणाच्या सांगण्यावरून होतेय, हे जगाला माहितीय”; ‘या’ नेत्याचा नेमका निशाणा कोणावर?

महाविकास आघाडीतील नेते अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप करून ईडी आणि सीबीआयकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

ईडी असो सीबीआय असो, ही कारवाई कुणाच्या सांगण्यावरून होतेय, हे जगाला माहितीय; 'या' नेत्याचा नेमका निशाणा कोणावर?
Follow us
| Updated on: Dec 27, 2022 | 6:35 PM

नागपूरः आमदार अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सीबीआयने न्यायालयात स्टे अर्ज दाखल केला होता. सीबीआयचा तो अर्ज न्यायालयाने नाकारल्यामुळे आता अनिल देशमुख यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार अनिल देशमुख आता बाहेर येणार असल्यामुळे महाविकास आघाडीतील सगळेच नेते मंडळी आनंदी असल्याचे मत आमदार सुनील राऊत यांनी व्यक्त केले आहे. ईडी, सीबीआयच्या कारवाईमुळे आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांना तुरुंगात राहण्याची वेळ आली आहे. ईडी आणि सीबीआयने केलेल्या कारवाईमध्ये आणि ज्या नेत्यांवर आरोप लावले गेले आहेत, ते सिद्ध झाले नाहीत.

त्यामुळे आता सीबीआय आणि ईडीचे अर्जही न्यायालयाकडून फेटाळले जात आहेत. त्यावरून ही कारवाई कोणाच्या आदेशावरून केली जाते हे लक्षात येते असा टोला सुनील राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला आहे.

महाविकास आघाडीतील नेते अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप करून ईडी आणि सीबीआयकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मात्र या कारवाईला कोणत्याही सत्याचा आधार नव्हता. सरकारविरोधात जे लोकं बोलतील त्यांना अटक करा असेच वर्तन हे सरकार करत असल्याची टीका सुनील राऊत यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सरकारविरोधात बोलले की, त्यांच्यावर कारवाई होते, त्या नेत्यांना अटक केली जाते. त्यामुळे ही कारवाई केली जात असली तरी ती कारवाई कोणाच्या सांगण्यावरून होते हे आता सगळ्यांना माहिती आहे म्हणत आमदार सुनील राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.