मनसे करणार विदर्भातील शेतकऱ्यांना मदत, इतक्या जणांना होणार फायदा
कृषी विद्यापीठाकडून मनसेनं खरेदी केलेलं बियाणं यवतमाळ जिल्ह्यात पोहोचलं आहे.
नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात. हे थांबविण्यासाठी मनसेनं मेगाप्लान तयार केलाय. विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी चांगलं बियाणं देण्याचा आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काढला. राज ठाकरे यांच्या आदेशानं उद्या मनसे नेते यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणं वाटणार आहेत. मनेसेचे नेते राजू उंबरकर उद्या दीड हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना बियाणं वाटणार आहेत.
कृषी विद्यापीठाकडून मनसेनं खरेदी केलेलं बियाणं यवतमाळ जिल्ह्यात पोहोचलं आहे. प्रति एकरी रब्बीसाठी चण्याचं बियाणं वाटणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पूरपीडितांना बियाणं वाटण्यात येणार आहेत. राज ठाकरे पूरग्रस्त अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात यंदा पुरानं मोठं नुकसान झालं. यामुळं शेतकऱ्यांकडं बियाणं खरेदी करण्यासाठी पैसे हातात नाही. अशावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. सुमार दीड हजार शेतकऱ्यांना बियाण वाटप करण्याचा संकल्प मनसेनं केला आहे.
हे सर्व बियाण गरजू शेतकऱ्यांना मोफत देण्यात येणार आहे. बियाण पेरून त्यापासून चांगलं उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं, असा मनसेचा प्रयत्न आहे. यातून शेतकरी आत्महत्येची धग थोडीफार का होईना कमी होईल, असा विश्वास मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.