नागपूर : मोबाईल चोरीला जाणे ही सहज घडणारी घटना. हे चोरीला गेले की, परत केव्हा मिळणार याची काही शास्वती नसते. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष केलं जातं. पण, मोबाईलमध्ये बरेच नंबर्स असतात. महत्त्वाचे फोटोज असतात. त्यामुळं बऱ्याच जणांचा जीव तुटतो. मोबाईल (Mobile) गेला तरी चालेल पण, त्याचा डाटा मिळायला हवा, असंच बहुतेक जणांना वाटते. असेच काही मोबाईल जरीपटका पोलिसांनी शोधून काढले. त्यांच्याकडे असलेल्या मिसिंगची शहानिशा केली. आणि प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day) औचित्य साधून सतरा जणांना मोबाईल परत करण्यात आले. याचा आनंद संबंधितांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
मोबाईल चोरी व मिसिंग झाल्यास मिळणे अशक्य समजले जाते. पण जरीपटका ठाण्या अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जानेवारी महिन्यात मोबाईल चोरी व मिसिंग झालेल्या 22 तक्रारींपैकी 17 मोबाईल पोलिसांनी मिळविले. मालकांना त्यांचे मोबाईल जरीपटका पोलीस ठाणेमार्फत मिळवून दिले. मोबाईल मिळाल्यामुळे मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. मोबाईल आता प्रत्येकाच्या जीवनाची गरज झाली आहे मोबाईल शिवाय राहणे कठीण झाले. अशात आपला हरवलेला मोबाईल परत मिळाला तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे मोबाईल वापस मिळलेल्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, अशी माहिती जरीपटका येथील पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितलं.
जरीपटका पोलीस ठाण्यात सुनील यादव व गौरी हेडाऊ हे मोबाईल मिसिंग सेल सांभाळतात. जानेवारी महिन्यात पंचेवीस मोबाईल परत मिळविले. त्यापैकी सतरा मोबाईलचे वितरण संबंधितांना करण्यात आले. यासाठी पोलिसांच्या चमुला बरीच मेहनत घ्यावी लागली. संबंधितांना कळविण्यात आले. प्रजासत्ताक दिनी मोबाईल हरवलेल्यांना गूड न्यूज मिळाली. आपले मोबाईल हातात परत येताच. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मोबाईल खिशात घेऊन फिरायची वस्तू. पण, चोरीला गेल्यास मिळण्याची शक्यता कमीच. पण, जरीपटका पोलिसांनी पंचेवीस मोबाईल महिनाभरात शोधून काढले. प्रजासत्ताकदिनी ते परत केलेत.