पावसाच्या धारांची प्रतीक्षा, सध्या घामाच्या धारा, विदर्भात केव्हा बरसणार मान्सून?

सिमेंटचे रस्ते असल्याने ते चांगलेच तापतात. त्यामुळे विदर्भातील लोकं पावसाची वाट पाहत आहेत. जून महिना लागल्याने पाऊस केव्हा येणार, याची प्रतीक्षा आहे.

पावसाच्या धारांची प्रतीक्षा, सध्या घामाच्या धारा, विदर्भात केव्हा बरसणार मान्सून?
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 6:43 PM

सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : विदर्भात सध्या पावसाला वेळ आहे. त्यामुळे पावसाच्या धारा बरसण्यास वेळ आहे. पण, उन्हाचा पारा चांगलाच तापत आहे. त्यामुळे घामाच्या धारा सध्या विदर्भातील लोकांच्या शरीरातून निघत आहेत. दुपारी रस्ते सामसूम असतात. लोकं उष्णतेमुळे घराबाहेर जाणे टाळतात. सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर पडावे लागते. दुपारी उष्ण तापमानामुळे संचारबंदी सदृश्य परिस्थिती नागपूर शहरात दिसते. सिमेंटचे रस्ते असल्याने ते चांगलेच तापतात. त्यामुळे विदर्भातील लोकं पावसाची वाट पाहत आहेत. जून महिना लागल्याने पाऊस केव्हा येणार, याची प्रतीक्षा आहे. हवामान खात्यानं यासंदर्भात अंदाज वर्तवला आहे.

विदर्भात १५ जूननंतर मान्सून येणार

विदर्भात मान्सून 15 जूनच्या नंतरच येणार आहे. नागपूर हवामान विभागाने असा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये अजून मान्सूनची परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे 15 जूनच्या आधी विदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे.

हे सुद्धा वाचा

सायंकाळी काही भागात हलक्या सरी

केरळमध्ये मान्सून आल्यानंतर 15 दिवसांत विदर्भात येत असतो. आता अरबी समुद्रात एक सायक्लोन बनताना दिसतो आहे. त्यात मान्सूनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या विदर्भाच्या तापमानात वाढ होणार आहे. चार ते पाच दिवस तापमान वाढलेलं असेल. सायंकाळच्या वेळेला काही भागात हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात.

sahu 2 n

पेरणीची घाई नको

मान्सून दरवर्षीच्या तुलनेत काहीसा उशिरा येणार असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करायला नको. केरळमध्ये मान्सून दाखल झाला की मग तो विदर्भात येतो, असाही अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तविला आहे. नागपूर हवामान विभागाचे उपसंचालक एम. एन. साहू यांनी ही माहिती आहे.

येत्या काही दिवसात राज्यातील काही जिल्ह्यांत वळवाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. आता राज्यात काही ठिकाणी वळवाच्या सरीवर सरी बरसतात. तर काही ठिकाणी उष्णतेची लाट सहन करावी लागत आहे.

दुपारी वाहतात घामाच्या धारा

हवामान खात्याने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, कोकण पट्ट्यांमध्ये आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे उकाडादेखील वाढला आहे. मात्र, दुपारी दोनपर्यंत उष्णतेच्या झळा असल्या तरीही त्यानंतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. कालपरवा काही ठिकाणी आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. पण, मान्सूनच्या पावसाची वाट अजूनतरी पाहावी लागणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.