विदर्भातील 41 पेक्षा जास्त विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, पालक चिंतेत! प्रशासनाने जारी केले हेल्पलाईन नंबर

विदर्भातील 41 पेक्षा जास्त विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती प्रशासनाकडं आहे. पालकांनी हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. यांनी केले आहे. पालक मात्र, चांगलेच चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांनी कसं परत आणता येईल, यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे.

विदर्भातील 41 पेक्षा जास्त विद्यार्थी अडकले युक्रेनमध्ये, पालक चिंतेत! प्रशासनाने जारी केले हेल्पलाईन नंबर
helpline
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 9:59 AM

नागपूर : विदर्भातील 41 पेक्षा जास्त विद्यार्थी (Students from Vidarbha) युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. नागपूर जिल्ह्यातील (Students from Nagpur District) पाच, भंडारा चार, बुलडाणा सहा आणि अमरावतीचे आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. गडचिरोली दोन, यवतमाळ सहा, चंद्रपूर सहा, वर्धा एक आणि गोंदियातील तीन विद्यार्थी अडकले असल्याची माहिती आहे. काल सायंकाळपर्यंत प्रशासनाकडे 41 विद्यार्थी अडकल्याची माहिती होती. या अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रशासनाच्या (Administration ) वतीनं सांगण्यात आलंय. नागपूर जिल्ह्यातील पाच पालकांनी संपर्क साधून विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती दिली. यामध्ये सेजल मिलिंद सोनटक्के, हिमांशु मोतीराम पवार, रविना प्रभाकर थाकीत, पीयूष मिलिंद गोमासे व तनुजा धर्मराज खंडाळे यांचा समावेश आहे. याची माहिती केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे.

खालील क्रमांकावर साधा संपर्क

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष क्र. 0712-2562668 ई-मेल- rdc_nagpur@rediffmail.com केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली हेल्पलाईन नंबर 1800118797 (टोल फ्री) फोन – 011-23012113/23014105/23017905 Fax no.-011-23088124, Email ID:-situationroom@mea.gov.in

नागपूर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. विमला यांनी केले आहे.

खाद्यतेलाच्या किमतीत वाढ

युक्रेन आणि रशिया युद्धाचा परिणाम खाद्यतेलांवर होतोय. युक्रेनवरील संकटामुळं शेंगदाणा, पामोलीन आणि सोयाबीनसह अन्य तेलांचे दर एकाच दिवशी 150 रुपये वाढले आहेत. सोयाबीनचे दर सात हजार रुपये क्विंटलपेक्षा जास्त झालेत. युद्धामुळे खाद्यतेल उत्पादनावर परिणाम झाल्याने सोयाबीनची दरवाढ झालेत. सोयाबीनचे दर वाढल्याने व्यापारी, शेतकरी उत्साही आहेत. सूर्यफुलाचे उत्पादक देश रशिया आणि युक्रेन आहे. सध्या युद्ध सुरू असल्यानं तेलाची निर्यात थांबविण्यात आली आहे. सोयाबीन तेल प्रतिकिलो सहा रुपये महाग झाले. तर शेंगदाणा तेल दहा रुपये प्रतिकिलो महाग झाले.

अणू युद्धाचा धोका टळलाय

रशियानं युक्रेनची राजधानी कीवमध्येही प्रवेश केलाय. अशा स्थितीत युक्रेनच्या सैन्याची शरणागती घेण्यासाठी रशियाला दोन-तीन दिवस लागतील. संपूर्ण युक्रेनवर ताबा घेण्यासाठी आठ दिवस लागेल. युक्रेनच्या चर्नोबिल अणू प्रकल्पावर रशियानं ताबा मिळवलाय. त्यामुळे अणू युद्धाचा धोका टळलाय, असं निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

युनिक कलेक्शन बघायचंय, तर चला सुरेश भट सभागृहात, नागपुरात आज आणि उद्या विविध कलाकृतींचा संग्रहच संग्रह…!

Nagpur Campaign | रविवारपासून पल्स पोलिओ अभियान, नागपूर महापालिकेने काय केली तयारी?

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी विमानाने आणणार, राजनाथ-गडकरी यांची चर्चा; लिस्ट तयार!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.