“अब्दुल सत्तारांच्या एक नाही अशा 50 फाईल्स आता बाहेर येतील”; सत्तारांवरच्या आरोपांची यादी वाढली….

काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी तर वाशिममधील गायरान घोटाळ्याबरोबरच त्यांच्या संस्था आणि औरंगाबादमधील त्यांची अशी अनेक प्रकरणं आता आम्ही बाहेर काढणार असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

अब्दुल सत्तारांच्या एक नाही अशा 50 फाईल्स आता बाहेर येतील; सत्तारांवरच्या आरोपांची यादी वाढली....
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 5:13 PM

नागपूरः वाशिममधीय गायरान जमिनीच्या घोटाळ्यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी आता ठाम भूमिका घेतली आहे. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असा इशाराच विरोधी गटाकडून देण्यात आला आहे. ठाकरे गटासह काँग्रेसच्या आमदारांनीही आात अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसून त्यांचा आणखी काही प्रकरणं बाहेर काढू असा इशारा आता काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.

वाशिम येथील 80 कोटी किंमत असणारी गायरानची जमीन आपल्या पदाचा गैरवापर करून त्या जमिनीची व्यवहार फक्त 2 कोटी रुपयांना केला असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे.

2011 मध्ये उच्च न्यायालयाने गायरान जमिनीबाबत महत्वाचा निर्णय देऊन त्या निर्णयामध्ये गायरान जमिनी आता कोणालाही देता येणार नाहीत असं नमूद करण्यात आले होते. तरीही आपल्या मंत्री पदाचा गैरवापर करून गायरान जमिनीबाबत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर करण्यात आला आहे.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय आणि सत्तार यांनी घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हेही दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांना आता राजीनामा द्यावा लागणार असल्याचेच त्यांनी म्हटले आहे.

यावर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी तर वाशिममधील गायरान घोटाळ्याबरोबरच त्यांच्या संस्था आणि औरंगाबादमधील त्यांची अशी अनेक प्रकरणं आता आम्ही बाहेर काढणार असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.

अब्दुल सत्तार यांनी मंत्रा झाल्यावर एक संस्था स्थापन करून त्या संस्थेमध्ये आपल्याच नातेवाईकांना सदस्य करून घेतले आहे. त्याबरोबरच त्यांनी त्या संस्थेच्या माध्यमातून मोठा घोटाळा केला असल्याचा आरोपही कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.

त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत आता काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांची घोटाळ्याची 50 पेक्षा जास्त प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा त्यांनी त्यांना इशारा दिला आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना गायरान जमिनीचं प्रकरण महाग जाणार असं विरोधकांनी म्हटले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.