Nagpur Congress | खासदार संभाजी राजेंचे उपोषण, बाळासाहेब थोरात म्हणतात, समाधान करण्याचा प्रयत्न करू

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं आढावा घेतला. पण, ते खासदार संभाजे राजे यांना सांगण्यात कुठेतरी कमी पडलो. आम्ही त्यांना उपोषण करू नका, अशी विनंती केली होती. पण, त्यांचे समाधान झालेले नाही. आम्ही त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी नागपुरात दिलं.

Nagpur Congress | खासदार संभाजी राजेंचे उपोषण, बाळासाहेब थोरात म्हणतात, समाधान करण्याचा प्रयत्न करू
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 11:39 AM

नागपूर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) व समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजी राजे (MP Sambhaji Raje) यांनी कोल्हापुरात उपोषण सुरू केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. मराठा आरक्षण व समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्या, ही संभाजी राजे यांची प्रमुख मागणी आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Congress leader Balasaheb Thorat ) नागपुरात म्हणाले, खासदार संभाजी राजे आज उपोषणाला बसतायत. त्यांना आम्ही उपोषणाला बसू नका, अशी विनंती केली होती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी करायची आहे. संभाजी राजे यांच्या मागण्यांवर राज्य सरकार काम करतंय. मुख्यमंत्री आणि आमची परवा बैठक झाली. काही निर्णय घेतले. बरंच काम झालंय. पण खासदार मोहदयांना ते सांगण्यात आम्ही अपयशी पडलोय. त्यांचे समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी दिलं.

अध्यक्षपदाच्या नावाबाबत चर्चा

बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यघटनेत उल्लेख आहे की सभागृहाचा अध्यक्ष निवडलाच पाहिजे. राज्यपाल कोश्यारी यांना पुन्हा एकदा पत्र दिलंय. खात्री आहे की राज्यपाल ते मान्य करतील. अध्यक्षांच्या निवडीसाठी नऊ तारीख ठेवलीय. विधानसभा अध्यक्षांची निवड होईल. विधानसभा अध्यक्षपदाच्या नावाबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालीय. तो काही प्रश्न नाही, असं त्यांनी सांगितलं.

राज्याचं उत्पन्न घटलं

काँग्रेसमधील मंत्रीमंडळातील बदलाची चर्चा कुठून आली माहीत नाही. मी काँग्रेसचा नेता आहे. माझ्याशी अद्याप हायकमांड किंवा आमच्या पतळीवर काही चर्चा नाही, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं. कोरोनाच्या संकटामुळे उत्पन्न घटल्याने खर्चाचं प्राधान्य ठरवावं लागलं. आरोग्याला प्राधान्य दिलं. पण नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय चांगलं करायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दबावातून सत्ता घेण्याची भाजपची प्रथा

भाजपची राजकारण करण्याची पद्धत देशानी पाहिली. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सत्ता हवी, हा त्यांचा प्रयत्न असतो. त्यासाठी यंत्रणांचा वापर होतो. लोकशाहीत सत्तेबाबत लोकांनी निर्णय घ्यायला हवा. भाजपची प्रथा दबावातून सत्ता घ्यायची आहे, असा घणाघातही बाळासाहेब थोरात यांनी केला. ते म्हणाले, समाजघटकांना बरोबर घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचा आहे. ओबीसी समाजात विजय वडेट्टीवार सतत प्रयत्न करत आहेत. त्यांना आमची कायम साथ आहे.

युनिक कलेक्शन बघायचंय, तर चला सुरेश भट सभागृहात, नागपुरात आज आणि उद्या विविध कलाकृतींचा संग्रहच संग्रह…!

Nagpur Campaign | रविवारपासून पल्स पोलिओ अभियान, नागपूर महापालिकेने काय केली तयारी?

युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी विमानाने आणणार, राजनाथ-गडकरी यांची चर्चा; लिस्ट तयार!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.