Nagpur | मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पूर्व विदर्भातील 204 किमींच्या रस्त्यांची कामे होणार

 गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी येथील रस्त्यासाठी 13 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर, पवनी, लाखांदूर व साकोली या गावांसाठी 16 कोटी 71 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

Nagpur | मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पूर्व विदर्भातील 204 किमींच्या रस्त्यांची कामे होणार
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्व विदर्भासाठी निधी मंजूर झाला आहे.Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 4:41 PM

नागपूर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत (CM Gramsadak Yojana) येणाऱ्या नागपूर विभागातील  204 .59 किमींच्या रस्त्यांची कामे जलद गतीने होणार आहेत. त्यासाठी साधारणतः 157 कोटी 60 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आ. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांच्या पाठपुराव्याचे हे यश मानले जात आहे. विभागात येणाऱ्या नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांतील रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत समावेश करण्यात आला होता. परंतु त्याचे पुढे काहीच झाले नसल्याने आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिषदेत हा मुद्दा उचलून धरला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी रस्त्यांचे बांधकाम एडीबी योजनेच्या अंतर्गतच होणार असून, कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी

यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी येथील रस्त्यासाठी 13 कोटी 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात तुमसर, पवनी, लाखांदूर व साकोली या गावांसाठी 16 कोटी 71 लाख रुपये मंजूर झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी आणि सावली गावासाठी 6 कोटी 26 लाख रुपये मंजूर झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात अहेरी, कोरची, सिरोंचा, मुलचेरा, एटापल्ली, चामोर्शी आणि धानोरासाठी 97 कोटी 40 लाख निधी तर नागपूर जिल्ह्यातील सावनेर, हिंगणा, उमरेड, कुही आणि भिवापूरसाठी 23 कोटी 69 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी हसन मुश्रीफ यांनी दिली.

नागपुरात किशोर कुमेरिया फुंकणार शिवसेनेत प्राण?, 25 नगरसेवक निवडून आणण्याची ताकद!

मला मंत्रिपद का मिळालं नाही हे राजू शेट्टीच सांगतील, आमदार Devendra Bhuyar यांचा टोला

Heat Wave | विदर्भात उष्णतेची लाट, उन्हाची झळ प्राण्यांनाही, महाराजबागेत प्राण्यांसाठी लागले कुलर्स

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.