Nagpur Education | मनपा शाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? शिक्षणाधिकारी म्हणतात, 26 शाळा बंद नव्हे त्यांचे एकत्रीकरण

मागील तीन वर्षांपासून महापालिकेच्या शाळाकडे प्रशासनाच दुर्लक्ष झाल्याचं दिसून येते. 2019 - 20 ते 2022 पर्यंत महापालिकेच्या 26 शाळा बंद झाल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षकांची संख्या ही खालावली असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली.

Nagpur Education | मनपा शाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? शिक्षणाधिकारी म्हणतात, 26 शाळा बंद नव्हे त्यांचे एकत्रीकरण
नागपूर मनपाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 5:15 AM

नागपूर : मागील तीन वर्षात झाल्या महापालिकेच्या (Municipal Corporation) 26 शाळा बंद झाल्या. 2019 ते 2022 या काळात झाल्या शाळा बंद माहितीच्या अधिकारातून (Right to Information) आली बाब समोर आली. नागपूर शहरात महापालिकेच्या 157 शाळा होत्या ती संख्या आता 131 वर आली. एकीकडे महापालिका सामान्य परिवारातील विद्यार्थ्यांसाठी (Student) इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्याचा गाजावाजा करत आहे. मात्र दुसरीकडे सुरू असलेल्या मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमातील शाळा बंद करत आहे. शाळेत रोडवलेली संख्या असो की मग इतर प्रश्न कारण अनेक असली तरी गरिबांच्या हक्काची शाळा बंद होत असेल तर खरच प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणाचा अधिकार मिळेल का असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोल्हारकर (Abhay Kolharkar) विचारत आहेत. महत्वाचं म्हणजे या शाळा सामान्य नागरिकांच्या मुलांसाठी शिक्षणाची मोठी सोय होती.

16 शाळांचे एकत्रीकरण

2020-21 मध्ये महानगरपालिकेची एकही शाळा बंद झालेली नाही, असं स्पष्टीकरण मनपाच्या शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिलंय. प्रशासकीय व विद्यार्थ्यांच्या सोयीस्तव एकाच इमारतीत एकाच माध्यमाच्या दोन किंवा अधिक शाळा भरत होत्या. अशा एकूण 16 शाळांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. 2020-21 मध्ये 10 शाळांची वैयक्तिक पटसंख्या कमी असल्याने नजीकच्या महानगरपालिकेच्या शाळेत सदरर्हू 10 शाळा समायोजीत करण्यात आल्या आहेत. 2021-22 मध्ये महानगरपालिका शाळांतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या कमी झालेली नाही. पटसंख्या मागील वर्षीपेक्षा 309 ने वाढलेली आहे. या वर्षी नव्याने उघडलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पटसंख्येत भरीव वाढ होण्याची शक्यता आहे.

शिक्षक-विद्यार्थ्यांचे प्रमाण नियमानुसार

वर्षनिहाय सेवानिवृत्तीमुळे शिक्षक संख्येत कमी होत असली तरी शासन धोरणाप्रमाणे शिक्षक-विद्यार्थी यांचे दिलेल्या प्रमाणानुसार महापालिकेत पुरेश्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध आहेत. माध्यमिक विभागात गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांचे तसेच कनिष्ठ महाविद्यालयावर कार्यरत शिक्षक शाळांच्या संख्येप्रमाणे कमी आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता कंत्राट तत्वावरील पुरेश्या संख्येत शिक्षक नेमण्यात आलेले आहेत, असंही प्रीती मिश्रीकोटकर यांनी सांगितलं. 2020-21 व 2021-22 मध्ये कोरोनाचे प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी व शिक्षकांची नियमीत उपस्थिती नाही. त्यामुळं शालेय शिक्षणाबरोबरच राबविणारे अनेक उपक्रम जसे (सायकल बँक, स्वेटर वितरण, स्कूल बॅग इ) राबविण्यात आले नाहीत. तसेच दरवर्षी प्रती विद्यार्थी 2 गणवेश. पुरविण्यात येतात. परंतु शासन निर्णयाप्रमाणे शाळा सुरू नसल्यामुळे 2 वर्षांपासून फक्त एक गणवेश देण्यात आला.

Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल

Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.