Nagpur Crime : नागपूरात भाजप नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, पबमध्ये झाला वाद
नागपूच्या मेडीकल चौकाजवळ व्हीआर मॉलमधील एजंट जॅकमध्ये झालेल्या भांडणानंतर, इमामवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत कांबळे स्क्वेअर येथे पहाटे भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याच्यासह इतरांवर जीवघेणा हल्ला झाला.
![Nagpur Crime : नागपूरात भाजप नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, पबमध्ये झाला वाद Nagpur Crime : नागपूरात भाजप नेत्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला, पबमध्ये झाला वाद](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/12/Ajent-Jack-Bar-Nagpur.jpg?w=1280)
गजानन उमाटे, नागपूर : भाजपाचे माजी नगरसेवक मुन्ना यादव (Munna Yadav) यांच्या मुलासह तीघांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. नागपूच्या मेडीकल चौकाजवळ व्हीआर मॉलमधील एजंट जॅकमध्ये झालेल्या भांडणानंतर, इमामवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत कांबळे स्क्वेअर येथे पहाटे भारतीय जनता पक्षाचे नेते मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याच्यासह इतरांवर जीवघेणा हल्ला झाला. पबमध्ये झालेल्या भांडणातून आठ जणांनी मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी प्रदिप उईके कुंभारटोली घंतोली यासह आठ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी प्रदिप उईके याला पोलिसांनी अटकही केली आहे.
बारचा परवाना रद्द करण्यासाठी पोलिस आयुक्तांचे जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र
व्हीआर मॉलमधील ‘एजंट जॅक’चा बारचा परवाना रद्द करण्यासाठी शहर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असून बारमध्ये वारंवार मारामारी होत असल्याने शेवटी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, बारचा परवाना रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले जाईल कारण असामाजिक कृत्ये आणि अनुचित घटनांमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या दोन वर्षांत बारमध्ये घडलेल्या घटनांची यादीही पोलिस आयुक्तांनी मागवली आहे. अलीकडे, 14 डिसेंबर रोजी बारमध्ये हाणामारी झाली ज्याची इमामवाडा पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. बारमध्ये समाजकंटक आणि स्थानिक गुन्हेगार वारंवार येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, असे सुत्रांनी सांगितले. या कारवाईवर लक्ष ठेवण्यासाठी शहर पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/10025326/Chandra.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/06012542/kodanda.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/07/03004048/Mata-Lakshmi-5.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/18205525/Bhagwat-Geeta.jpg)