नागपूर : नंदनवन पोलिस स्टेशनच्या हद्दीत दारुच्या वादातून मित्राची हत्या करण्यात आली.
मृतकाचे नाव दिनेश राजापुरे (वय 40) असून तो दर्शन कॉलोनीतील रहिवासी आहे. नंदनवनमधील सेंट झेवीअर शाळेजवळ ही घटना काल दुपारी घडली. अतुल हेमराज शिवणकर (वय 23) असे आरोपीचे नाव आहे. त्याने दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली आहे.
दारु पिताना झालेल्या किरकोळ वादातून दिनेशची हत्या झाली. अतुलने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. दिनेशला दारुचे व्यसन होते. त्यामुळं त्याची पत्नी दोन मुलांसह त्याच्यापासून वेगळी राहत होती. दिनेश आणि अतुल हे दोघेही पेंटिंगची कामे करतात. या कामाचे एक हजार रुपये त्यांना मिळाले होते. दारू विकत घेऊन सेंट झेवीअर शाळेजवळील झुडपात दारू पित बसले होते दुपारी तीन वाजताच्या त्यांच्यात भांडण झाले.
अतुलने दिलेल्या कबुलीनुसार, दिनेशने अतुलला शिविगाळ केली होती. तसेच मारहाणही केली होती. त्यामुळं अतुलने दगडाने वार करून दिनेशला मारले. यात दिनेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अतुल थेट नंदनवन पोलिसांत गेला. पोलीस अतुलला घेऊन घटनास्थळावर गेल्यानंतर खरी परिस्थिती समोर आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर झोन चारचे डीसीपी नरुल हसन घटनस्थळी पोहचले. दिनेशचे पार्थिव शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठविण्यात आले. अतुलला अटक करण्यात आली.
घर बघायला आलेल्या महिलांनी हुडकेश्वरमध्ये चोरी केल्याची घटना उघडकीस आली. 74 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्या महिलांनी लंपास केले. कीर्तीनगरच्या कुसुम शिंदेकर यांनी घरासमोर घर विकणे आहे, अशी पाटी लावली होती. मंगळवारी दुपारी दोन महिला घर बघायचे आहे, असे सांगून घरी आल्या. एकीने त्यांना बोलण्यात गुंतविले, तर दुसरीने कपाटातील साहित्य लंपास केले. हुडकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका चोरट्याने सायकलने जात असलेल्या चैतराम चामट यांना 50 रुपयांची मागणी केली. चैतराम यांच्या खिशात पैसेच नव्हते. त्यामुळं भुरट्या चोरांनी त्यांच्याकडे असलेला दीड हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावला. चैतराम हे कळमन्यातील विजयनगर येथे राहतात. मंगळवारी सायंकाळी सायकलने जात असताना ही घटना घडली.
शेतात जाणाऱ्या महिलेची दोन्ही पाय कापून हत्या, जोडव्यांच्या चोरीसाठी सशस्त्र हल्ला
मशिनमध्ये स्कार्फ अडकला, पुण्यात 21 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू