Nagpur | माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य, जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, काय आहे ही स्पर्धा?

माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आहे. यासाठी 15 मार्चपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील. लोकशाही बळकटीकरणासाठी जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशिलतेचा वापर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

Nagpur | माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य, जनजागृतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, काय आहे ही स्पर्धा?
मतदार जागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या स्पर्धेचे घोषवाक्य.
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 12:17 PM

नागपूर : भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त (National Voters Day) माझे मत माझे भविष्य (My opinion, my future) एका मताचे सामर्थ्य ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरु केलीय. या स्पर्धेसाठी 15 मार्च 2022 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. स्वीप कार्यक्रमांतर्गत स्पर्धा आयोजित करुन आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशिलतेचा वापर लोकशाही बळकटीकरणासाठी करत आहे. माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत पाच प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. यामध्ये प्रश्नमंजूषा (Quiz) स्पर्धा, घोषवाक्य तयार करण्याची स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आणि पोस्टरची डिझाईन करण्याची स्पर्धा यांचा समावेश करण्यात आला आहे.

खालील संकेतस्थळावर भेट द्या

प्रश्नमंजूषा स्पर्धेद्वारे निवडणुकीबाबतची जागरुकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्पर्धकांनी तपशिलवार मार्गदर्शक तत्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ http://ecisveep.nic.in/contest येथे भेट दयावी. प्रवेशिका सर्व तपशिलांसह Voter-contest.gov.in येथे ई-मेल करावेत. ई-मेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी यांचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी.

15 मार्चपर्यंत पाठवा प्रवेशिका

सर्व प्रवेशिका 15 मार्चपर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशिलांसह Voter-contest.gov.in या ई-मेलवर पाठविण्यात याव्या, असेही आयोगाच्या वतीने कळविण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मतदार जनजागृती स्पर्धा आहे. यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आर. विमला यांनी केले आहे. माझे मत माझे भविष्य एका मताचे सामर्थ्य ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आहे. यासाठी 15 मार्चपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील. लोकशाही बळकटीकरणासाठी जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशिलतेचा वापर करा, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

Nitin Gadkari : नागपूर महापालिकेचं तिकीट कुणाला? ज्याच्या मागं जनता त्यालाच, नितीन गडकरींचा इच्छुकांना सूचक इशारा

Bhandara | मोहाडी, लाखांदुरात भाजपची, तर लाखनीत राष्ट्रवादीची सत्ता; मोहाडीतील विजयी मिरवणुकीत चार नगरसेवक का अनुपस्थित?

नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्याचा अहवाल सादर, घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता, प्रशासनातील अधिकारी अडकणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.