नागपूर : सुराबर्डी परिसरात 23 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह काल रात्री सापडला. वाडी पोलीस (Wadi Police) ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी हा मृतदेह आढळला होता. तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. प्रथमदर्शनी तिची हत्या झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात तरुणीची हत्या झाली नाही. तिने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा (Shocking Revealed) झालेला आहे. या संदर्भात शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी माहिती दिली आहे.
तरुणी गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय पोलिसांना आहे. ती मंगळवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतरचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरून तरुणीची हत्या झाली नाही. तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच यासंदर्भात अंतिम निष्कर्षापर्यंत जाता येईल, असे देखील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
खासगी कारणाने मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात इतर कुणाचा सहभाग दिसून येत नाही. तरी तिने खोटं कारण सांगून मित्राकडून डिझेल मागवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.