CCTV VIDEO: नागपूरात पेट्रोल पंपावर शुल्लक कारणावरुन कर्मचाऱ्याला पळवून पळवून मारलं; चाकूच्या हल्लात जखमी

मारहाणीचा हा सगळा प्रकार पेट्रोल पंपवर घडत असताना त्या ठिकाणी पेट्रोलसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मारहाण झाल्याची सगळी दृश्य पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद्य झाली असून या प्रकरणातील चारही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

CCTV VIDEO: नागपूरात पेट्रोल पंपावर शुल्लक कारणावरुन कर्मचाऱ्याला पळवून पळवून मारलं; चाकूच्या हल्लात जखमी
पेट्रोल पंपावरची मारहाण सीसीटीव्हीत कैदImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 8:34 PM

नागपूरः नागपूरच्या (Nagapur) कळमना पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका पेट्रोल पंपवर (Petrol Pump) चार जणांनी शुल्लक कारणावरून कर्मचाऱ्यावर चाकूने हल्ला (Attack) करण्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीची संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पेट्रोल पंपावर ज्या चौघांनी दहशत माजवून कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे, त्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील एचपीच्या पेट्रोल पंपवर दोन दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी चाकूने एका कर्मचाऱ्यांवर शुल्लक कारणावरून हल्ला केला. आरोपींच्या हातात चाकु होता त्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला तर कर्मचाऱ्यानी बचावासाठी हातात काठी घेऊन त्यांचा प्रतिकार केला. या घटनेत कर्मचारी किरकोळ जखमी झाला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीचा हा सगळा प्रकार पेट्रोल पंपवर घडत असताना त्या ठिकाणी पेट्रोलसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मारहाण झाल्याची सगळी दृश्य पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीमध्ये कैद्य झाली असून या प्रकरणातील चारही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.

पेट्रोल पंपावर हा प्रकार घडत असताना पेट्रोलसाठी अनेक ग्राहक त्या ठिकाणी थांबले होते. शुल्लक कारणावरुन वाद झाल्यानंतर ज्यावेळी कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात येत होती. त्यावेळी मारहाणीच्या भीतीने कर्मचारी पळून जाताना दिसत आहे. त्यामुळे चौघांकडून दहशत माजवण्याचा प्रकार होत असल्याने पोलिसांची दहशत राहिली नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त करण्यात आली.

संबंधित बातम्या

Sandeep Deshpande : ‘शरद पवार महाराष्ट्राची माफी मागा’, मनसेची मागणी; तर ‘तुम्हालाच अनेकवेळा माफी मागावी लागेल’, गृहमंत्र्यांचा पलटवार

Osmanabad : पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा तब्बल 6 महिन्यांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

tv9 Special: ‘दिलासा घोटाळा’ या नावानं उदयास आलेल्या नव्या घोटाळ्याची नेमकी व्याख्या काय?

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.