शिंदेंनी तिकीट ज्यांचं नाकारलं त्यांनी आता…; आदित्य ठाकरे यांचा सल्ला काय?
Aditya Thackeray on Krupal Tumane Shivsena Eknath Shinde Group : त्या नेत्याचं शिंदेंनी तिकीट नाकारलं आता त्यांनी...; आदित्य ठाकरे यांचा सल्ला काय? शिंदे गटातील नेत्यांना आदित्य ठाकरे काय म्हणाले? नागपुरात माध्यमांशी बोलताना काय म्हणाले? वाचा सविस्तर...
रामटेक लोकसभा मतदारसंघातून कृपाल तुमाने यांचं तिकीट नाकारत राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे कृपाल तुमाने यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी एक सल्ला दिला आहे. उमेदवारांची बंडखोरांनी आणि गद्दारीमध्ये फरक असतो. या कृपाल तुमाने यांचे तिकीट नाकारल्यानंतर 40 गद्दार यांनी सुद्धा समोरचा विचार केला पाहिजे. जिथे जिथे गद्दारांना तिकीट मिळाली आहे. मागील दहा वर्षात काय कामं झाली हे सर्वांना माहित आहे, असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
आज यवतमाळ मध्ये संजय देशमुख यांच्या उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे. सभा हे प्रचार होणार आहे. अजून महायुतीकडून अजून उमेदवार दिला नाही. त्यांचे सगळे भ्रष्ट उमेदवार देणार आहेत. की नवीन चेहरा येणार आहे हा प्रश्न आहे…, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपवर निशाणा
जगात एक एप्रिल हा दिवस एप्रिल फुल हा दिवस साजरा होत असताना आपल्याकडे अच्छे दिन म्हणून तो दिवस साजरा होतो. देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. दिल्ली बिहार महाराष्ट्र बंगाल इंडिया आघाडीची बांधणी जी आहे ती मजबूत असल्याचे दिसून येत आहे. पंतप्रधान दौरा काही दिवसांपूर्वी शिवसेना वाचवायला राष्ट्रवादीच्या विरोधात लढत होते. आधी विरोधात असणाऱ्या लोकांना यांनी सोबत घेतलं आहे. आत त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी काही दिवसांपूर्वी काही लोक काय बोलत होते. त्यांनी जेव्हा गद्दारी केली. कुठल्या कुठल्या पक्षात कोण कोण आहे हे लोकांना माहित आहे. चित्र आता स्पष्ट झालंय. त्यामुळे यंदा लोकसभेला माहविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत. आम्ही ही विचारांची लढाई लढत आहोत आणि ही लढाई जिंकणार देखील आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.
“लोकशाही वाचवण्यासाठी लढतोय”
देशातली लोकशाही संपत चाललेली आहे. संविधान मोठा धोका आहे. अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लढत आहोत. लोकशाही वाचण्यासाठी आम्ही लढत आहोत.बंडू जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सर्वात लोकांना सोबत घेऊन चालत आहे. महाराष्ट्रातील सगळेच लोक जे आहे ते सोबत आहेत, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.