PhD बाबतच्या विधानावर अजित पवारांकडून दिलगिरी; म्हणाले…

Ajit Pawar Apology on PhD Statement : अजित पवार यांचं 'ते' वक्तव्य, टीकेची झोड अन् आता दिलगिरी.... पाहा काय म्हणाले अजित पवार? ते वक्तव्य नेमकं काय आहे? 'त्या' वक्तव्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करतो, असं अजित पवार काय म्हणाले? जुन्या पेन्शन योजनेवर अजित पवार यांचं मत काय?

PhD बाबतच्या विधानावर अजित पवारांकडून दिलगिरी; म्हणाले...
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 12:29 PM

नागपूर | 14 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत एक विधान केलं. हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात बोलताना अजित पवार यांनी पीएचडीबाबत विधान केलं. पीएचडी करून काय दिवे लावणार? असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत सुरु असलेल्या आंदोलनावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांकडून दिलगिरी

पीएचडी संदर्भात मी काल जी भूमिका मांडली. त्याचा विपर्यास करण्यात आला. मी याआधीही सभागृहात भूमिका मांडली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती केली होती. त्या समितीने सारथी, महाज्योती, बार्टी किती विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे. याबाबत अभ्यास केला. मला कुणावर टीका करायची नाही. पण काही लोक राजकीय नेत्यांवर पीएचडी करत आहेत. त्या नेत्यांची मी नावं घेत नाही. पण पीएचडी एक महत्वाचा अभ्यास विषय आहे. त्यात खूप अभ्यास करावा लागतो. त्यामुळे पीएचडीचा विषय तसा हवा, असं अजित पवार म्हणाले.

“तरूणांनी कौशल्यावर आधरित शिक्षण घ्यावं”

काही लोकांनी पीएचडी व्हावं. काही लोकांनी कौशल्यावर आधारित शिक्षण घ्यावं. ट्रेनिंग दिल्यास नोकरी मिळू शकते. जर्मन भाषा जर येत असेल. तर प्लंबर फिटर अशा प्रकारची कामं तिकडं करता येतील. तिथं चार लाख मुला-मुलींची गरज आहे. पण त्यासाठी जर्मन भाषा आली पाहिजे. त्यासाठी जर्मन भाषा तरूणांनी शिकावी, यासाठी आम्ही प्रोत्साहन देतोय. ज्या मुलांना परदेशात नोकरी करावी वाटत असेल. तर त्यांनी या संधीचा फायदा करून घ्यावा, असं अजित पवार म्हणाले.

जुन्या पेन्शन योजनेवर अजित पवार म्हणाले…

जुन्या पेन्शन योजनेबाबत सुरु असलेल्या आंदोलनावरही अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. जुन्या पेन्शनबद्दल काल बैठक झाली. चर्चा झाली. वेगवेगळ्या संघटनेचे कामगार नेते उपस्थित होते. त्यांची समजूत काढली. तीन लोकांची कमिटी केली अहवाल आपल्याला आला आहे. आम्ही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये पेन्शन द्यायची. आम्ही त्यांची समजूत काढली की, सरकार पेन्शन देण्यासाठी सकारात्मक आहे.विधानसभा निवडणुकीच्या आधी पेन्शन संदर्भात सकारात्मक निर्णय सरकार घेईल, असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.