Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भातील शेतकऱ्यांवर संकट; हवामान खात्याच्या इशाऱ्याने बळीराजा धास्तावला…

पुढील दिवसात ढगाळ वातावरण राहून तापमानात घट होणार आहे तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होणार आहे. त्यामुळे गारपीट आणि वादळी वारा होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांवर संकट; हवामान खात्याच्या इशाऱ्याने बळीराजा धास्तावला...
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 7:45 PM

नागपूर : मागील आठवड्यात विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. गहू, मका, कापूस, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जोरदार दणका दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर नांगर फिरवला होता. एकीकडे हे चालू असतानाच आता हवामान खात्याने मात्र आता पुन्हा एकदा गारपीठ होण्याची शक्यता वर्तवल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

आता या काळात गारपीठ झालीच तर मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या बळीराजाला गारपीठ झालीच तर मात्र आता जगणार कसा हा प्रश्न उभा राहणार आहे.

नागपूरसह संपूर्ण विदर्भात येणाऱ्या 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर 16 आणि 17 मार्च रोजी ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील दोन दिवसात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने राज्याच्या इतर भागातसुद्धा पावसाची शक्यता नागपूर हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.

येणाऱ्या पुढील दिवसात ढगाळ वातावरण राहून तापमानात घट होणार आहे तर काही ठिकाणी गारपीटसुद्धा होणार आहे. त्यामुळे गारपीट आणि वादळी वारा होण्याची शक्यता असल्याने हवामान खात्याकडून शेतकऱ्यांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आज पासून पावसाला काही भागात सुरवात होऊन त्यामध्ये वाढ होणार असल्याचेही सांगितले आहे. तर 16 आणि 17 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम. एम साहू यांनी वर्तविला असल्याने शेतकऱ्यांनाही सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.