Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ई-सेवा केंद्र, रेशनकार्डवरुन भाजप आक्रमक, मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरु, तीन आमदारांचा इशारा

नागपूर शहरात ई-सेवा केंद्र वाढवावे, राशनकार्ड वरून काही नागरिकांना अजूनही रेशन मिळत नाही त्यांना त्वरित रेशन सुरू करावे आणि निराधार नागरिकांचे मानधन देण्यात अशा काही मागण्या भाजपने केल्या आहेत.

ई-सेवा केंद्र, रेशनकार्डवरुन भाजप आक्रमक, मागण्या मान्य करा अन्यथा रस्त्यावर उतरु, तीन आमदारांचा इशारा
NAGPUR BJP PROTEST
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 10:07 PM

नागपूर : सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना घेऊ नागपूर भाजप आक्रमक झाली आहे. नागपूर शहरात ई-सेवा केंद्र वाढवावे, रेशनकार्ड वरून काही नागरिकांना अजूनही राशन मिळत नाही त्यांना त्वरित रेशन सुरू करावे आणि निराधार नागरिकांचे मानधन देण्यात अशा काही मागण्या भाजपने केल्या आहेत. या मागण्यांसाठी भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या सगळ्या मागण्या मान्य झाल्या नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारादेखील भाजपने दिला आहे. (nagpur bjp demands to increase e seva centers and activate ration card of poor people)

शहरात फार कमी ठिकाणी ई-सेवा केंद्रे

नागपुरातील भाजप आमदार प्रवीण दटके, मोहन मते आणि विकास कुंभारे या तीन आमदारांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आलं. यावेळी काही नागरिकसुद्धा उपस्थित होते. शहरात फार कमी ठिकाणी ई-सेवा केंद्रं आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात वेगवेगळे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होते. गर्दी होऊ नये म्हणून ई-सेवाकेंद्रांमध्ये वाढ करण्याला महापालिकेने परवानगी दिली आहे. असे असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयात त्याची प्रक्रिया थांबलेली आहे. ही प्रक्रिया लवकरत लवकर पूर्ण करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

निराधार नागरिकांना त्यांचं मानधन वेळेत द्यावे

तसेच अनेक नागरिकांचे राशन कार्ड एनपीए करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना रेशन मिळत नसल्यामुळे एनपीए रेशन कार्डदेखील सुरु करावे आणि निराधार नागरिकांना त्यांचं मानधन वेळेत द्यावे अशी मागणी यावेळी भाजपच्या आमदारांनी केली. निवेदन देऊनही या मागण्या मान्य झाल्या नाही तर आगामी काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.

इतर बातम्या :

भाजपचं मिशन नागपूर महापालिका, युवा वॉरिअर्सची फळी उभारणार,चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

VIDEO : तृतीयपंथींचा धिंगाणा, पैसे न दिल्याने घरात घुसून टीव्ही, फ्रीजची तोडफोड, आई आणि मुलाला मारहाण

नागपूर मनपाचं पितळ उघडं, लाखो रुपये खर्चूनही सखल भागात पाणी साचलं

(nagpur bjp demands to increase e seva centers and activate ration card of poor people)

'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप.
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित
डीजे क्रेटेक्सने कुकरीने केक कापला; सुरज चव्हाण देखील उपस्थित.
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल
बोगस शिक्षक भरती घोटाळा; मुख्य आरोपीची ऑडिओ क्लिप व्हायरल.