चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जोरदार टीका; म्हणाले, यांच्या नादी…

Chandrashekhar Bawankule on Sharad Pawar : चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकूीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं. किती जागा जिंकणार? याचा अंदाजही बावनकुळे यांनी सांगितला. शरद पवारांचं नाव घेत बावनकुळे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जोरदार टीका; म्हणाले, यांच्या नादी...
शरद पवार, चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 1:08 PM

विधानसभा निवडणूक होत आहे. अशात प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पूर्ण बहुमताने महाराष्ट्रात महायुतीचा सरकार येत आहे आणि प्रचंड मोठा विजय महाराष्ट्रात मिळणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आमचा जाहीरनामा मान्य केला आहे. आमचा जाहीरनामा पसंत पडलेला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत. 165 च्या वर आमच्या जागा येणार आहेत, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. अपक्ष आमच्या संपर्कात आज नाहीत. मात्र सरकार आल्यावर अपक्ष सरकार सोबत उभे राहतात, असंही त्यांनी म्हटलं.

शरद पवारांवर निशाणा

शरद पवार यांनी कालच्या सभेत बोलताना कुणाचाही नाद करा. पण माझा नाद करू नका, असं म्हटलं. त्यांच्या या विधानावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या नादी कोण लागलंय? त्यांच्या नादी त्यांचे लोक लागले आहेत. आमच्याकडे मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारकडे एवढं काम आहे की आमच्या कामामुळे लोक आम्हाला मतं देतात. शरद पवारांकडे नादी लागायचं आम्हाला काम नाही, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

महाविकास आघाडीवर निशाणा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीकडून वर्तमान पत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आमची जाहिरात खरी आहे. मविआची जाहिरात खोटी आहे, आपसातल्या वादामुळे महाविकास आघाडी लोकसभेचा जो परफॉर्मन्स होता तो होणार नाही. काँग्रेसने खोटं बोलून लोकसभेत मत घेतली. चार महिन्यात जनतेने काँग्रेसला सोडलं. हरियाणा काँग्रेसला नाकारलं आहे. महाराष्ट्रातही जनता काँग्रेससाठी तयार नाही. मला विश्वास आहे पूर्ण बहुमताने महायुतीचा सरकार येणार आहे, असं बावनकुळे म्हणालेत.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या रोड शोमध्ये काल राडा झाला. यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या प्रकाराबद्दल मला फार माहिती नाही. पण मला असं वाटतं की लोकांमध्ये भावना आहे की ते भाजप कार्यकर्ते वगैरे काही नाही. राहुल गांधी आरक्षणाबाबत जे प्रदेशात बोलले. त्यामुळे राहुल गांधी यांच्याबद्दल चीड आहे. म्हणून जनतेच्या मनात आक्रोश आहे, असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.