प्रदेश महासचिवांची हकालपट्टी करा, नागपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर, गटबाजी उफाळली

दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांच्यावर आरोप करणाऱ्या ‘प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा’, असा ठराव नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला आहे.

प्रदेश महासचिवांची हकालपट्टी करा, नागपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर, गटबाजी उफाळली
Ashish Deshmukh, Sunil Kedar
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 12:13 PM

नागपूर: राज्याच्या उपराजधानी नागपूरमधील जिल्हा काँग्रेसमधील (Nagpur Congress) गटबाजी उफाळून आल्याचं चित्र आहे. काँग्रेस नेते पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात उघड भूमिका घेणाऱ्या आशिष देशमुख यांच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर, निलंबित गज्जू यादव यांना सोब घेऊन फिरणाऱ्या पालकमंत्र्याविरोधात देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळं नागपूर काँग्रेसमधील वाद काही थांबण्याचं चिन्ह नसल्याचं समोर आलं आहे.

आशिष देशमुख यांची हकालपट्टी करा

दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांच्यावर आरोप करणाऱ्या ‘प्रदेश महासचिव आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करा’, असा ठराव नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला आहे. ‘मंत्री सुनील केदार यांची बदनामी केल्याचा दावा करत आशिष देशमुखांच्या हकालपट्टीची मागणी’ करण्यात आली आहे. जिल्हा परिषद पोटनिवडणूकीबाबत झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला आहे.

नितीन राऊत यांच्यावर नाराजी

नागपूरचे पालकमंत्री काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्यावरही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निलंबित गज्जू यादव यांना सोबत घेऊन फिरणाऱ्या पालकमंत्र्यांवरंही नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

बेईमानी करणाऱ्या नेत्याला गाडीतून ओढून लावा

जिल्हा परिषदेच्या पोटनिवुडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सुनिल केदार उपस्थित होते. नागपूर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत मंत्री सुनील केदार यांनी पक्षाशी बेईमानी करणाऱ्या नेत्याला गाडीतून ओढून लावा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

नागपूर काँग्रेसमध्ये पुन्हा गटबाजी

नागपूर काँग्रेसमधील गटबाजी काही केल्या कमी होत नसल्याचं चित्र समोर येत आहे. नागपूर काँग्रेसमध्ये आशिष देशमुख, दुग्ध विकासमंत्री सुनील केदार आणि पालकमंत्री नितीन राऊत यांच्या गटांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत दिसून आलं आहे. आता, जिल्हा काँग्रेस पुढील काळातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना कसं सामोरं जाणार हे पाहावं लागणार आहे.

सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढा, आशिष देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे मंत्री सुनील केदार यांच्याविरोधात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली होती. 2002 मध्ये मंत्री सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे 150 कोटी रुपये खासगी दलालांमार्फत रोख्यांमध्ये गुंतवून बँकेचे दीडशे कोटी रुपयांचे नुकसान केल्याचे आरोप सुनील केदार यांच्यावर आहेत. या प्रकरणी केदार व इतर 10 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्याने कोर्टात खटला दाखल केला आहे.

कोण आहेत आशिष देशमुख?

आशिष देशमुख हे 2014 मध्ये नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर आमदार होते. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पराभूत करत त्यांनी विजय मिळवला होता. अनिल देशमुख हे आशिष देशमुखांचे काका असून काका-पुतण्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. आशिष देशमुख हे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे पुत्र आहेत.

इतर बातम्या:

आमच्या पक्षातील ‘या’ नेत्याला मंत्रिमंडळातून काढा, काँग्रेस नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी

Nagpur Congress Committee approve proposal of removal of Ashish Deshmukh

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.