कोरोना निर्बंधांची पायमल्ली, नागपुरात चार लग्न समारंभांवर कारवाई, तर भंडाऱ्यात लग्नाचा लॉन सील

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न समारंभांवर आता कारवाई करण्यास सुरुवात झालीये. नागपुरात चार ठिकाणाहून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर भंडाऱ्यात दुसऱ्यांदा नियम मोडल्याने लॉन सील करण्यात आले आहे (Nagpur corona restrictions break action took on four marriages and one lawn sealed in Bhandara).

कोरोना निर्बंधांची पायमल्ली, नागपुरात चार लग्न समारंभांवर कारवाई, तर भंडाऱ्यात लग्नाचा लॉन सील
Bhandara Lawn
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 10:39 AM

नागपूर : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लग्न समारंभांवर आता कारवाई करण्यास सुरुवात झालीये. नागपुरात चार ठिकाणाहून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर भंडाऱ्यात दुसऱ्यांदा नियम मोडल्याने लॉन सील करण्यात आले आहे (Nagpur corona restrictions break action took on four marriages and one lawn sealed in Bhandara).

नागपुरात चार लग्न समारंभांवर कारवाई –

कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने आजपासून प्रतिबंधात्मक नियमात बदल केले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागपुरातील चार लग्न समारंभावर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडात्मक कारवाई करीत 50 हजारांचा दंड वसूल केला.

दोन कारवाया धंतोली झोनमध्ये तर हनुमान नगर आणि नेहरुनगर झोनमध्ये प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली. पहिली कारवाई धंतोली झोनंतर्गत असलेल्या सुयोग नगर येथील रंजना सेलिब्रेशन हॉलवर करण्यात आली. येथे लग्नसमारंभात 100 पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी झाले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आलेले नव्हते.

कुटुंबाला आणि लॉन मालकाला प्रत्येकी 10 हजार रुपये असा 20 हजारांचा दंड ठोठावला. याच झोननंतर्गत दुसरी कारवाई चिचभवन येथे मनोज बोबडे यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभावर करण्यात आली. त्यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तिसरी कारवाई हनुमान नगर झोनंतर्गत असलेल्या मारकंडे सभागृहात करण्यात आली. अभिजित पराते यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला तर नेहरुनगर झोन अंतर्गत करण्यात आलेल्या अन्य एका कारवाईत कडबी चौकातील चामट सभागृहात उपद्रव शोध पथकाने एकनाथ चामट यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

भंडारा तहसीलदार यांनी मुजोर लॉन मालकाच्या मुसक्या आवाळल्या

कोरोना नियमाची पायमल्ली करत मोठ्या संख्येने लग्न सोहळा साजरा करणाऱ्या लॉनला भंडाऱ्याच्या तहसीलदारांनी टाळं ठोकलं आहे. पूर्वी दंड ठोठावत तंबी दिल्यावरही दुसऱ्यांदा नियम मोडल्याने लॉन सील केले आहे.

कोरोना नियमाची पायमल्ली केल्या प्रकरणी सुरुवातीला 10 हजार रूपयाच्या दंड वसूल केल्यानंतर ही दुसऱ्यांदा कोरोना नियमाला हरताळ फासत लॉनमध्ये 50 लोकांना शासनाकडून परवानगी असतांना 250 वऱ्हाड्यांना लग्नात सामिल होण्यास परवानगी देणाऱ्या लॉन मालकाच्या मुसक्या भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांनी आवळल्या असून कोरोना नियम दोनदा मोडणाऱ्या संबधित लॉनला 7 दिवसासाठी सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

भंडारा शहरालगत बेला गावातील श्यामसुंदर लॉनमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. श्यामसुंदर लॉनचे मालक शनोद समीरदास यांना 27 जूनला त्यांच्या लॉनमध्ये मोठ्या संख्येने लोक लग्न सोहळ्यात उपस्थित असल्याप्रकरणी तहसिलदारांनी 10 हजार रुपयांचा दंड ठोठवला होता, असे असतांना सुद्धा लॉन मालकाने कोणताही बोध न घेता दुसऱ्याच दिवशी 50 लोकांची परवानगी असतांना 250 लोकांना लग्न सोहळ्यात उपस्थित राहु दिले. या प्रकरणी भंडारा तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या तपासणीत हे निदर्शनात आल्याने अशा आयोजनावर आळा घालण्यासाठी श्यामसुंदर लॉन चक्क सात दिवस सील करत कारवाई केली आहे.

शासन-प्रशासनाकडून कोरोना नियमाचे पालन करत आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्याबाबत कितीही ओरड होत असली तरी ग्रामीण भागात कोरोना नियमाला सपशेल तिलांजली दिली जात असल्याच्या प्रकार उघड होत असल्याने नाईलाजास्तव प्रशासनाला अशी कठोर पावले उचलावी लागत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, नागपुरात नवे निर्बंध

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंट चे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आलेले आहेत. त्यानुसारच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नवे निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहेत.

नवे निर्बंध

? सर्व दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार

? मॉल्स बंद

? हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार

? लग्नकार्य 50% क्षमतेने किंवा पन्नास लोकांमध्येच करता येणार

? जिम, सलून, स्पा दुपारी चार वाजेपर्यंत खुले राहणार

? अंतयात्रेला केवळ 20 लोकांना परवानगी असणार

? स्विमिंग पूल बंद असणार

नागपुरात गेल्या आठ दिवसांपासून रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आणि राज्यात काही ठिकाणी आढळून आलेल्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण यामुळेच जिल्हा प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nagpur corona restrictions break action took on four marriages and one lawn sealed in Bhandara

संबंधित बातम्या :

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, मॉल्स बंद, दुकानं 4 वाजेपर्यंत सुरु, सोमवारपासून नागपुरात नवे निर्बंध

मोठी बातमी ! पुण्यात संध्याकाळी 5 नंतर संचारबंदी लागू, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, नवी नियमावली जारी

नागपुरात कोरोना लसीकरणाला तुफान प्रतिसाद, एकाच दिवसात तब्बल 42 हजार नागरिकांचे लसीकरण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.