नागपूर कोरोनाच्या विळख्यात, सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांपेक्षा अधिक; आरोग्य विभाग सतर्क

उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात येताना दिसून येत आहे. शहरातील रुग्ण संख्या दर दिवसाला वाढत असून, सध्या शहरामध्ये एकूण 4 हजार 158 सक्रिय रुग्ण आहेत.

नागपूर कोरोनाच्या विळख्यात, सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांपेक्षा अधिक; आरोग्य विभाग सतर्क
corona test
Follow us
| Updated on: Jan 11, 2022 | 6:02 PM

नागपूर :  राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढला आहे. राज्यात दररोज हजारो कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. डेल्टासोबतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देखील राज्यात धुमाकूळ घातला आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (nagpur) ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून, ओमिक्रॉनबाधितांची संख्या हाजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. नागपुरात कोरोनासोबत ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने  जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासठी विविध उपयायोजना करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर निर्बंधांमध्ये वाढ करण्यात  आली आहे. तसेच आरोग्य विभागाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समाधानाची बाब म्हणजे अनेक कोरोनाबाधितांमध्ये लक्षणेच दिसत नसल्याने त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती नागपूर महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

4 हजार हजारांपेक्षा अधिक सक्रिय रुग्ण

उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात येताना दिसून येत आहे. शहरातील रुग्ण संख्या दर दिवसाला वाढत असून, सध्या शहरामध्ये एकूण 4 हजार 158 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्या विभागाकडून  खबरदारी घेण्यात येत असून, वांरवार शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. अनेक कोरोनाबाधितांमध्ये लक्षणेच आढत नसल्याने त्यांना घरीच क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. दुसऱ्या लाटेच्या तुलनेमध्ये कोरोनाबाधितांच्या मृत्यूमध्ये घट झाल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.

  कोरोना परिस्थितीचा आढावा

– नागपुरात सक्रिय रुग्ण संख्या – 4 हजार 158 – गृह विलागीकरनात असलेले रुग्ण – 2 हजार 192 – 50 टक्के रुग्ण रुग्णालयात – नागपुरात सध्या हॉटस्पॉट नाहीत – सर्दी खोकल्याच प्रमाण जास्त – दर दिवसाला 9 ते 10 हजार चाचण्या

गेल्या पाच दिवसातील कोरोना आकडेवारी

6 जानेवारी – 441 रुग्ण , 0 मृत्यू 7 जानेवारी – 698 रुग्ण , 0 मृत्यू 8 जानेवारी – 691 रुग्ण , 0 मृत्यू 9 जानेवारी – 832 रुग्ण , 0 मृत्यू 10 जानेवारी -971 रुग्ण , 0 मृत्यू

नागपुरातील ही आकडेवारी बघितली तर दिसून येते की रुग्णसंख्या सतत वाढत आहे मात्र मृत्यू च प्रमाण शून्य आहे . बऱ्याच नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, मात्र त्यांना लक्षण अगदी कमी प्रमाणात असल्याने जास्तीत जास्त रुग्ण हे गृह विलगिकरणामध्ये असल्याचं पाहायला मिळते.  गृह विलगिकरणातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, काही प्रमाणात संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या 

Nagpur | ‘संक्रांत’ येऊ नये म्हणून सावध व्हा! नायलॉन मांजाने गळे कापणे सुरूच; पोलिसांची धडक कारवाई

Cold | विदर्भ गारठले : थंडी, पावसाचा विचित्र संगम; पिकांवर काय होणार परिणाम?

Nagpur | पालकमंत्री राऊतांनी घेतला बुस्टर डोज; आणखी कोणकोण आहेत बुस्टरसाठी फ्रंटलाईनवर?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.