Nagpur Corona Update | नागपूरकरांना दिलासा, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे शून्य मृत्यूची नोंद
नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी आहे. नागपुरात गेल्या 24 तासात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. या महिन्यात तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली असल्याने नागपूरकरांना नक्कीच दिलासा मिळाला आहे (Nagpur corona update zero deaths recorded in last 24 hours).
नागपूर : नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी आहे. नागपुरात गेल्या 24 तासात शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. या महिन्यात तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली असल्याने नागपूरकरांना नक्कीच दिलासा मिळाला आहे (Nagpur corona update zero deaths recorded in last 24 hours).
तर कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत शहरात फक्त 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झालीये. तर दिवसभरात 69 जणांनी केली कोरोनावर मात केलीये. त्यासोबतच कोरोना मुक्त होण्याचा दर 98.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर नागपुरातील कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्याही 426 वर आली आहे.
नागपुरातील एकूण रुग्णसंख्या –
एकूण रुग्ण संख्या – 4 लाख 76 हजार 984
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 4 लाख 76 हजार 533
एकूण मृत्यू संख्या – 9 हजार 025
रुग्ण संख्या आणि मृत्यू संख्या दोन्ही कमी होत असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरियंट आणि तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नवीन निर्बंध लावण्यात आले आहेत.
नागपुरात व्यापाऱ्यांमध्ये नाराजी
महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. या दरम्यान अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकान उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण यामुळे व्यापारी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
नागपुरात व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र आहे. नागपुरात आजपासून नवीन निर्बंध लागू झाले आहेत. त्यामुळे नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमध्ये आज सकाळपासून लगबग पाहायला मिळत आहे. आजपासून बाजार 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार असल्याने अनेक व्यापारी सकाळी लवकर दुकानात पोहोचले आहेत.
नागपुरात सकाळी 11 च्या दरम्यान उघडणारा बाजार आज सकाळी उघडायला सुरुवात झाली आहे. वेळ कमी असल्याने व्यापाऱ्यांना लगबग करावी लागत आहे. या निर्बंधांमुळे व्यवसाय करायला कमी वेळ मिळत आहे. हे निर्बंध 5 जुलैपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे व्यापारी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे.
देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट
गेल्या 24 तासांत आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 46 हजार 148 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 979 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. कालच्या दिवसात देशात 58 हजार 578 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 2 लाख 79 हजार 331 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 2 कोटी 93 लाख 9 हजार 607 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 लाख 96 हजार 730 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 5 लाख 72 हजार 994 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
India reports 46,148 new #COVID19 cases, 58,578 recoveries and 979 deaths in the last 24 hours as per the Union Health Ministry
Total cases: 3,02,79,331 Total recoveries: 2,93,09,607 Active cases: 5,72,994 Death toll: 3,96,730
Recovery rate: 96.80% pic.twitter.com/po62eUmMhC
— ANI (@ANI) June 28, 2021
Nagpur corona update zero deaths recorded in last 24 hours
संबंधित बातम्या :
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट, कोरोनाबळी एक हजाराखाली