नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, काय आहे प्रकरण?

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी एमडी ड्रग विरोधात कारवाई केली. 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग जप्त केले.

नागपूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई, तीन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, काय आहे प्रकरण?
आरोपींना अटक करून घेऊन येताना इमामवाडा पोलीस. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 9:37 AM

नागपूर : नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना (Nagpur Crime Branch) गुप्त माहिती मिळाली. त्या माहितीनुसार, 3 ते 4 युवक हे एमडीसाठी मुंबईला गेले होते. ते मुंबईवरून ड्रग घेऊन परत येणार होते. पोलिसांनी या प्रकरणाची खात्री केली. त्यानंतर सापळा रचला. 3 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 41.50 ग्राम ड्रग जप्त केलं. घेत आहेत. या गुन्ह्यात हे केव्हापासून जुळले आहेत. यांनी कोणासाठी हे ड्रग आणले होते. यांच्यासोबत आणखी कोणी आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोज सिडाम (Inspector of Police Manoj Sidam) यांनी दिली. गुन्हे शाखा पोलिसांनी याचा तपास आता इममवाडा पोलिसांकडे (Imamwada Police) सोपविला. मात्र, नागपुरात वाढत असलेला ड्रगचा वापर थांबविण्याचा खरी गरज आहे.

आरोपींच्या घरावर ठेवली पाळत

नागपुरातील काही युवक एमडीचं काम करण्यासाठी मुंबईला गेले होते. खबऱ्यांकडून या माहितीची शहानिशा करण्यात आली. पोलीस कर्मचारी, पंच आणि खबऱ्यांसह आरोपीच्या घरावर पाळत ठेवली होती. आरोपींचं प्लानिंग सुरू होती. कुणी काय करायचं हे ठरत होतं. पंचाससमोर झडती घेतली. ड्रग सापडल्याने आरोपींवर कारवाई करण्यात आली. इमामवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रीयांशू हा मुख्य आरोपी

अमन खरे, प्रीयांशू गजभिये, सोनू कोडापे या तीन आरोपींना अटक केली आहे. प्रीयांशूवर यापूर्वीही अशाप्रकारची कारवाई करण्यात आली होती. आरोपी म्हणतात की, त्यांनी सेवन करण्यासाठी एमडी आणले होते. परंतु, येवढ्या मोठ्या प्रमाणात सेवन करण्यासाठी आणले जाऊ शकत नाही, असं पोलिसांचं म्हणण आहे. प्रीयांशूवर यापूर्वी अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं ते विक्रीसाठी आणले असावे, असा पोलिसांची अंदाज आहे.

तोंडी परीक्षेहून येताना काळाचा घाला, बाईक अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

VIDEO | भाजप नगरसेवकाकडून मारहाण, नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्याचा विक्की कुकरेजांवर आरोप

Video – Nagpur Crime | दुचाकीस्वार आले, वृद्ध महिलेच्या हातून पैशांची पिशवी घेऊन पळाले! सीसीटीव्हीत घटना कैद

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.