पोलीस आले नसते तर ती झाली असती विधवा, पोलिसांनी वाचवलं कुंकू, काय घडलं?

महाराष्ट्र पोलिसांनी आतापर्यंत अनेकवेळा आपल्या ड्युटीपलीकडे जात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अशातच पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवलाय. पोलीस जर वेळेवर आले नसते तर महिला विधवा झाली असती. नेमकं काय होतं प्रकरण जाणून घ्या.

पोलीस आले नसते तर ती झाली असती विधवा, पोलिसांनी वाचवलं कुंकू, काय घडलं?
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 6:00 PM

नवरा-बायकोचं भांडण काही नवीन नाही. घरोघरी मातीच्या चुली या म्हणीप्रमाणे प्रत्येक ठिकाणी काहीना काही सुरूच असतं. मात्र काहीवेळा या भांडणाचं रुपांतर मोठ्या वादातही होतं. सातजन्म साथ देण्याचं दिलेलं वचन विसरून विभक्त होण्याचा निर्णय घेतात. काहीवेळा तर ही भांडणं जिवावर उठतात. अशातच नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आही. बायकोने थंड जेवण दिलं म्हणून नवऱ्याने असं काही केलं की सर्वांनाच धक्का बसला.

नेमकं काय आहे प्रकरण?

नागपूरमधील ठक्करग्राम येथे पोलीस पेट्रोलिंग करत असतात. त्यावेळी 112 क्रमांकावरून त्यांना एका महिलेचा फोन येतो. महिला रडत-रडत आपल्याला मारहाण झाल्याचं सांगते. मारहाण करणारा दुसरा तिसरा कोणीच नसून तिचाच पती असतो. पतीने दारू पिऊन आपल्यासह मुलांना माराहण करून घराबाहेर काढल्याचं ती सांगते. सर्वांना बाहेर काढत स्वत: घरामध्ये गेला असून दरवाजा आतून बंद केलेला असतो. पोलीस जराही वेळ न दवडता घटनेच्या ठिकाणी पोहोचतात.

पोलीस स्टेशन परिसराताली बीट मार्शल घटनास्थळाव पोहोचतात. तेव्हा घराबाहेर लोकांची गर्दी जमलली असतो. पोलीस दरवाजा ठोठावतात मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नाही. पोलिसांना चाहुल लागते की दरवाजा उघडला जात नाहीये याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. पोलीस काही वेळ वाट पाहतात आणि शेवटी दरवाजा तोडून आतमध्ये जातात. त्यावेळी सर्वांनाच धक्क बसतो.

महिलेचा पती पंख्याला ओढणी बांधून गळफास घेण्याच्या तयारीत असतो. त्यावेळी बीट मार्शल प्रफुल पटेल आणि देवेंद्र हे आतमध्ये जातात आणि त्याचे पाय पकडतात. त्यानंतर त्याला विश्वासात घेत बीट मार्शल खाली उतरवतात. खाली घेताच पतीला गळफास घेण्याचे कारण विचारतात त्यावेळी तो जे उत्तर देतो ते ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. गळफास घेण्याचं कारण म्हणजे पत्नीने त्याला जेवणात थंड भाजी वाढली.

जर वेळेवर पोलीस पोहोचले नसते तर संंबंधित व्यक्तीने आपलं जीवन संपवलं असतं. पेट्रोलियमवर असलेल्या पाचपावली पोलीस स्टेशनचे बीट मार्शल अतुल, मनोज, देवेंद्र आणि प्रफुल याचं पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी कौतुक केलं. त्यासोबतच यापुढेही अशा प्रकारचे कार्य पोलिसांनी करत राहा याबाबत प्रेरणा दिली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.