नागपुरातील भाजपच्या ३१ नेत्यांवर गुन्हे दाखल, जमावबंदी असताना काढला होता मोर्चा
मोर्चा काढण्याच्या आधल्या दिवशी पोलीस आयुक्तांनी जमावबंदीला आदेश जारी केला. होता. परंतु, मोर्चा नियोजित असल्याने काढल्याने भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. मोर्चा चिरडून टाकण्यासाठी हा जमावबंदीचा आदेश लागू केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने आज होणारी राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
नागपूर : शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलीस आयुक्तांनी जमावबंदीचा आदेश लागू केलाय. शहरातील जमावबंदीला झुगारून भारतीय जनता पक्षाने यशवंत स्टेडियम येथून दोन दिवसांपूर्वी मोर्चा काढला. सुमारे 10 हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित होते. नागपूरच्या धंतोली पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या भाजपच्या ३१ नेत्यांवर गुन्हे दाखल केले. भाजप नेत्यांसह 2 ते 3 हजार अन्य लोकांवरही कलम 144 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
केशरी शिधापत्रिकाधारकांचा प्राधान्य गटात समावेश करावा आणि गुंठेवारीचे वाढलेले शुल्क तात्काळ कमी करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा काढण्याच्या आधल्या दिवशी पोलीस आयुक्तांनी जमावबंदीला आदेश जारी केला. होता. परंतु, मोर्चा नियोजित असल्याने काढल्याने भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. मोर्चा चिरडून टाकण्यासाठी हा जमावबंदीचा आदेश लागू केल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. आता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने आज होणारी राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
शरद पवारांची सभा होणार?
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर ते वर्धमाननगरात सभा कार्यकर्त्यांना संध्याकाळी पाच वाजता संबोधित करणार आहेत. तिथे शेकडो कार्यकर्ते एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यांच्यावरही पोलीस गुन्हे दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळं शरद पवार यांची सभा होणार का आणि सभा झाल्यास पोलीस त्यांच्यावरही गुन्हे दाखल करणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
रविकांत तुपकर यांना नोटीस
शहरात जमावबंदीचा आदेश झुगारून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही नोटीस बजावली आहे. संचारबंदी असल्याने आंदोलन करू नका, असे पोलिसांनी त्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. मराठवाडा तसेच विदर्भात गावोगावी प्रभारफेरी काढणार असल्याचा मानस संघटनेने व्यक्त केला आहे.
Sharad Pawar | भाजपच्या गडात राष्ट्रवादीचं ‘मिशन विदर्भ’, शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘स्वाभीमानी’ आक्रमक; आजपासून तुपकरांचे बेमुदत उपोषण