नागपूरकरांवर नवं संकट, डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढणार? आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड
नागपूर शहरात आरोग्य विभागाला 9 हजार 800 पेक्षा जास्त घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे नागपूरकर कोरोना विषाणू संसर्गानंतर आता डेंग्यूला सामोरं जाव लागण्याची शक्यता आहे.
नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं दिलासा मिळाला होता. मात्र, नागपूरकरांवर आता नवं संकट उभं राहताना दिसत आहे. नागपूर शहरात आरोग्य विभागाला 9 हजार 800 पेक्षा जास्त घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे नागपूरकर कोरोना विषाणू संसर्गानंतर आता डेंग्यूला सामोरं जाव लागण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणातून भयावह स्थिती उघड
नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून शहरात डेंग्यूची भयावह स्थिती उघड झाली आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळलेल्या घरांवर कारवाई होणार का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतं आहे.
1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण
नागपूर महापालिकेनं 1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. नागपूर शहरात जानेवारी ते आतापर्यंत 442 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.
नागपूर महापालिका कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज
कोव्हिडच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे सक्षमतेने कोरोनावर नियंत्रण आणता यावे व या कार्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नागपूरतर्फे मनपाला 17 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व 8 बायपॅप मशीन भेट देण्यात आले.vनागपूर महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी ही भेट स्वीकारली.
नागपुरात डेल्टा प्लसचा शिरकाव
नागपूर शहरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हायरसचा शिरकाव झाला आहे. शहरात पहिल्यांदाच डेल्टा प्लसच्या पाच रुग्णांची नोंद झाली आहे. धंतोली, हनुमान नगर आणि मंगळवारी परिसरात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाल्याची मनपाच्या आरोग्य विभागानं माहिती दिली आहे. या सर्वांचे नमुने जुलै महिन्यात तपासणीसाठी पाठवले होते.
नागपूरमध्ये महामेट्रोच्या कंत्राटदाराकडून पाईपलाईन फुटली
महामेट्रोच्या कंत्राटदाराच्या दुर्लक्षानं नागपूरातील पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली होती. फुटाळा परिसरात 500 मी. मी. व्यासाची मुख्य पाईपलाईन फुटली आहे. पाईपलाईन फुटल्याने शहरातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मेट्रोच्या कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने पाईपलाईन फुटली. फुटाळा, संजय नगर, हिंदूस्थान कॅालनी, पंकज नगर परिसरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
इतर बातम्या:
परप्रांतीयांचा मुद्द्याला बगल, राज ठाकरेंच्या आदेशाने मनसे नेत्याची ‘हिंद मजदूर सभे’त एन्ट्री
Nagpur Dengue Update NMC survey found dengue mosquito in more than Nine Thousand houses Health Department on Alert