Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur GramPanchayat | नागपूर जिल्ह्यातील पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर, 53 ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी अधिसूचना

मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. 6 जून रोजी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 9 जून 2022 पर्यंत राहील.

Nagpur GramPanchayat | नागपूर जिल्ह्यातील पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर, 53 ग्रामपंचायतीतील रिक्त पदांसाठी अधिसूचना
आगामी निवडणुका होण्यात अडथळा?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 06, 2022 | 7:00 AM

नागपूर : राज्य निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यातील 53 ग्रामपंचायतीतील (Gram Panchayat) रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक असलेल्या क्षेत्रात (Constituency) निवडणूक आदर्श आचारसंहिता (Code of Conduct) लागू करण्यात आली आहे. ही आचारसंहिचा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे ९ जून २०२२ पर्यंत लागू राहील. मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही घोषणा आमदार, खासदार, पदाधिकारी यांना आता संबंधित ग्रामपंचायतीत करता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे. निवडणुका जाहीर होताच उभेच्छुक तयारीला लागले आहेत. रिक्त झालेल्या जागांवर निवडूण येण्यासाठी ते तयारी करत आहेत. उमेदवारांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न उभे राहू इच्छिणारे उमेदवार करत आहेत.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम

निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे आहे. 5 मे 2022 रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करावे. 13 मे ते 20 मे दरम्यान सुटीचे दिवस वगळून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जातील. त्यांची छाननी 23 मे रोजी 11 वाजतापासून होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 25 मे रोजी दुपारी 3 वाजतापर्यंत असेल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ 25 मे दुपारी 3 नंतर असेल. आवश्यक असल्यास मतदान 5 जून रोजी होईल. मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 अशी असेल. 6 जून रोजी मतमोजणी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक 9 जून 2022 पर्यंत राहील. (The last date for publication of notification of election results through Collectorate will be 9th June, 2022.)

हे सुद्धा वाचा

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही..
अजित पवारांची सभागृहात शायरी, म्हणाले; सुभानअल्लाह म्हणायचं नाही...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले...
“सर्वांसाठी घरे”, नवीन गृहनिर्माण धोरण कसं असणार अजित पवार म्हणाले....
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार
संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार.
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी नवी योजना, बळीराजा शेत, पाणंद रस्ते सुरु होणार.