Nagpur | वर्षातून तेरा दिवस वाजवा रे वाजवा!, पण, मर्यादेचे पालन करा, केव्हा वाजविता येणार दिवसभर ध्वनिक्षेपक?

ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी ध्वनिक्षेपक (Sound Speaker) वाजविण्यावर काही निर्बंध आहेत. पण, सण-उत्सवासाठी वर्षातून तेरा दिवस मुभा देण्यात आली आहे. सकाळी सात ते रात्री बारा वाजतापर्यत ध्वनिक्षेपक वाजविता येणार आहेत. पण, आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे.

Nagpur | वर्षातून तेरा दिवस वाजवा रे वाजवा!, पण, मर्यादेचे पालन करा, केव्हा वाजविता येणार दिवसभर ध्वनिक्षेपक?
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 6:29 AM

नागपूर : जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) यांच्यातर्फे वर्षभरात फक्त तेरा दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत पंधरा दिवसांपैकी तेरा दिवस सकाळी सात ते रात्री बारा वाजतापर्यंत ध्वनिक्षेपक (Sound Speaker) वाजविता येणार आहे. तसेच उर्वरित दोन दिवस हे स्थानिक परिस्थिती व आवश्यकतेनुसार निश्‍चित करण्यात येतील, असे ठरविण्यात आले. आढावा बैठकीमध्ये नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी सण-उत्सवासाठी पंधरा दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगीसाठी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास (Collector Office) सादर केली. तसेच पुढच्या वर्षामध्ये ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यासंबंधी जिल्ह्याच्या गरजेनुसार दिवस निश्‍चित करण्यात आले. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजतापर्यंत सूट जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

तेरा दिवस कोणते?

यामध्ये 21 मार्च शिवाजी महाराज जयंती, दहा एप्रिल रामनवमी, चौदा एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, 16 एप्रिल हनुमान जयंती, 16 मे बुद्ध पौर्णिमा, 31 ऑगस्ट, पाच सप्टेंबर, नऊ सप्टेंबर गणपती उत्सव, तीन आक्टोबर नवरात्री उत्सव, पाच ऑक्टोबर दसरा, धम्मचक्र प्रवर्तनदिन, नऊ ऑक्टोबर ईद- ए-मिलाद, 25 डिसेंबर ख्रिसमस, 31 डिसेंबर नववर्ष आगमन उत्सव या सण-उत्सवाचा समावेश आहे. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर या तेरा दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजतापर्यंत वापरण्यास परवानगी देण्यात येईल, असे ठरले.

ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून

नागपूरचे जिल्हादंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियम 2000 च्या अंमलबजावणीबाबत बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभागानं या बैठकीचे आयोजन केलं. बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी आढावा घेतला. यावेळी सहायक पोलीस आयुक्त नितीन जगताप, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंधरे उपस्थित होते. ध्वनी प्रदूषण होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळं नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. ध्वनिचा आवाज जास्त असल्याच काहींना भयंकर त्रास होतो. याचाही विचार जिल्हा प्रशासनाने केला आहे. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी ध्वनिक्षेपक वाजविण्यावर काही निर्बंध आहेत. पण, सण-उत्सवासाठी वर्षातून तेरा दिवस मुभा देण्यात आली आहे. सकाळी सात ते रात्री बारा वाजतापर्यत ध्वनिक्षेपक वाजविता येणार आहेत. पण, आवाजाची मर्यादा पाळावी लागणार आहे.

पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार, आणखी राज्यात किती प्रकल्प आणि निधीची व्यवस्था काय?

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची दहशत, दोन दिवसांत तिघांचा घेतला जीव, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला?

घरकुलाचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, प्राजक्त तनपुरे यांनी दिले आश्वासन, नागपुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.