Nagpur Youth | जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित, कुणाला आणि कसा करता येईल अर्ज?

जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा. युवा विकासाचे कार्य करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी शासनामार्फत देण्यात येतो. नागपूर जिल्ह्यातील युवक-युवती व संस्थांनी या पुरस्कारासाठी 21 मार्चपर्यंत दोन प्रतीत सिलबंद अर्ज करावे, असे आवाहन अविनाश पुंड यांनी केले आहे.

Nagpur Youth | जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित, कुणाला आणि कसा करता येईल अर्ज?
नागपूर येथील क्रीडा संकूल
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 5:00 AM

नागपूर : जिल्हा युवा पुरस्कार (District Youth Awards) जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्थांना (Registered Institutions) देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप गौरवपत्र, सन्मानचिन्ह, रोख पुरस्कार प्रती युवक व युवती रुपये 10 हजार व संस्थेसाठी रोख रक्कम रुपये 50 हजार अशा स्वरुपाचा असेल. जिल्हा पुरस्कारासाठी युवक व युवतींचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षपर्यंत असावे. जिल्ह्यात 10 वर्ष वास्तव्य असणे आवश्यक आहे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थेस विभागातून दिला जाणार नाही. पुरस्कार मरणोत्तर जाहीर करण्यात येणार नाही. केलेल्या कार्याचे सबळ वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफिती व छायाचित्र आदी पुरावे अर्जासोबत (Proof of Application ) जोडणे आवश्यक राहील.

संस्थांसाठी पात्रता

पुरस्कार संस्थेस विभागातून दिला जाणार नाही. संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान दोन वर्ष क्रीयाशिल कार्यरत राहणार असल्याचे हमीपत्र आवश्यक. अर्जदार संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लीक ट्रस्ट ॲक्‍ट 1950 नुसार पंजीबध्‍द असावी. संस्था नोंदणी झाल्यानंतर किमान पाच वर्षे कार्यरत असणे आवश्यक, संस्थांचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केले असावे. एका जिल्ह्यात पुरस्कार प्राप्त करणारी संस्था राज्यातील अन्य जिल्हयात जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार नाही. अर्जदार व संस्थेच्या सदस्यांचा पोलीस विभागाने प्रमाणित केलेला चारित्र्य दाखला देणे आवश्यक आहे.

संबंधित कागदपत्र आवश्यक

युवा विकासाचे कार्य करणाऱ्यांचे कार्य 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील गत तीन वर्षातील कामगिरी, युवकांनी ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य. राज्याचे साधन संपत्ती जतन व संवर्धन तसेच राष्ट्र उभारणीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरणारे कार्य, सामाजिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती व जनजाती आदिवासी भाग आदी बाबतचे कार्य. शिक्षण, प्रौढशिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, कला, मनोरंजन, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रुण, व्यसनमुक्ती तसेच युवांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देणारे कार्य. नागरी गलिच्छ वस्ती सुधारणा, झोपडपट्टी, आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक समस्या, महिला सक्षमीकरण आदीबाबत कार्य व साहसाबाबत कार्य. युवक युवती तसेच संस्थांनी पोलीस चारित्र्य व वर्तणूक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील. अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

युक्रेनमध्ये अमरावतीतील आठ विद्यार्थी अडकले; मायदेशी परत आणण्यासाठी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नागपूर शहरातील भूखंडांच्या नियमितीकरणाची दुरुस्ती केव्हा होणार?, महापालिकेच्या उत्पन्नावर पडतो प्रभाव

युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.