नागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या, तज्ज्ञ म्हणतात धोका कायम, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी

| Updated on: Jun 17, 2021 | 5:40 PM

राज्याची उपराजधानी नागपुरात लहान मुलांवरील कोरोना लसीची मेडिकल ट्रायल सुरू आहे. या ट्रायल दरम्यान मुलांच्या चाचण्या करण्यात आल्या, यात अनेक मुलांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे पुढे आलं आहे.

नागपुरात लहान मुंलांमध्ये अँटिबॉडीज आढळल्या, तज्ज्ञ म्हणतात धोका कायम, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी
Corona
Follow us on

नागपूर: राज्याची उपराजधानी नागपुरात लहान मुलांवरील कोरोना लसीची मेडिकल ट्रायल सुरू आहे. या ट्रायल दरम्यान मुलांच्या चाचण्या करण्यात आल्या, यात अनेक मुलांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे पुढे आलं आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. मात्र ही ट्रायल फार कमी मुलांवर असल्याने कोणीही धोका टळला असं समजून बिनधास्त होऊ नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (Nagpur Doctors appeal to take care of children from Corona due to Corona vaccine clinical trial taken on few children )

नागपूर शहरात दोन 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांच्या क्लिनिकल ट्रायलला सुरुवात झाली. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता आरोग्य तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या क्लिनिकल ट्रायल ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

कमी मुलांची चाचणी

सुरुवातीला 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची ट्रायल झाली त्यात 50 पैकी दहा मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आलेले आहे. तर काल 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांची ट्रायल झाली त्यात 35 पैकी 5 मुलांमध्ये अँटिबॉडी असल्याचं पुढे आलं ही बाब दिलासा देणारी असली तर यात फार कमी मुलांचा समावेश आहे. त्यामुळे कोणीही अस समजायला नको की प्रत्येक मुलांमध्ये अँटिबॉडीज निर्माण होत आहे त्यामुळे काळजी घेणे फार गरजेचे आहे, असं डॉ. वसंत खडतकर यांनी सांगितलं आहे.

सखोल अभ्यसाची गरज

लसीकरण आगोदर ट्रायल घेण्यात आलेल्या 20 टक्के मुलांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याने यावर आणखी सखोल अभ्यास होण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. कारण हा संपूर्ण अभ्यास फार कमी मुलांवर झाला आहे. त्यामुळे सगळ्याच मुलांमध्ये अँटिबॉडी निर्माण होतात असं नाही.सिरो सर्व्हेच्या माध्यमातून सुद्धा याचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे ट्रायल दरम्यान समोर आलेली बाब दिलासा देणारी नक्कीच आहे. पण बिनधास्त होऊन मुलांना आता कोरोना होणारच नाही ,असा आत्मविश्वस कोणीही बाळगायला नको असा सल्ला सुद्धा डॉक्टर देत आहेत.


संबंधित बातम्या:

चांगली बातमी ! नागपुरात 18 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी दोन हात करणे सोपे होणार ?

Maharashtra Coronavirus LIVE Update : भिवंडी शहरात 4 तर ग्रामीण भागात 50 नवे कोरोनाबाधित

(Nagpur Doctors appeal to take care of children from Corona due to Corona vaccine clinical trial taken on few children’s)