नागपूर सडक्या सुपारीचे केंद्र, परदेशातून कशी होते वाहतूक?; पोलीस, अन्न-प्रशासन विभाग करतात काय?

या सडक्या सुपारीच्या व्यवसायाचे तार इंडोनेशिया, नायजेरिया, थायलंड आणि श्रीलंकेशी जुळलेले आहेत. बांग्लादेश मार्गे छुप्या पद्धतीने भारतात ही सुपारी आणली जाते. आसाम, मेघालय, गुवाहाटी आणि नागालॅन्ड मार्गाने नागपुरात कोट्यवधीची सडकी सुपारी येते.

नागपूर सडक्या सुपारीचे केंद्र, परदेशातून कशी होते वाहतूक?; पोलीस, अन्न-प्रशासन विभाग करतात काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 6:27 PM

नागपूर : येत्या काही दिवसांत सडकी सुपारी मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. पोलिसांनी ही कारवाई केली. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी येते. त्यामुळं सडकी सुपारी वितरित करण्याचे एक मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे. नागपुरातून महिन्याला कोट्यवधी रुपयांची (Billions of rupees per month) सडक्या सुपारीची उलाढाल होत असल्याची माहिती आहे. खर्रा खाणाऱ्यांची संख्या विदर्भात मोठ्या प्रमाणात (In large numbers in Vidarbha) आहे. या खऱ्यासाठी ही सुपारी वापरली जाते. सडक्या सुपारीचा अवैध व्यवसाय हे पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनासमोर (Food and Drug Administration) मोठे आव्हान आहे. माहिती झाल्यास हे विभाग कारवाई करतात. पण, या व्यवसायाची जळेमुळे खोदून काढणे अत्यंत आवश्यक आहे. याकडे पोलीस, अन्न व औषधी प्रशासन दुर्लक्ष तर करत नाही, ना असा प्रश्न निर्माण होतो.

येथून होते सडक्या सुपारीची वाहतूक

सडक्या सुपारीच्या तस्करीमुळं केंद्र सरकार व राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांची करचोरी होते. ही करचोरी थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. या सडक्या सुपारीच्या व्यवसायाचे तार इंडोनेशिया, नायजेरिया, थायलंड आणि श्रीलंकेशी जुळलेले आहेत. बांग्लादेश मार्गे छुप्या पद्धतीने भारतात ही सुपारी आणली जाते. आसाम, मेघालय, गुवाहाटी आणि नागालॅन्ड मार्गाने नागपुरात कोट्यवधीची सडकी सुपारी येते.

सडक्या सुपारीवर नियंत्रण कसे मिळविणार?

सडक्या सुपारीचा वापर खऱ्यात तसेच गुटखा तयार करण्यासाठी केला जातो. खर्रा तसेच गुटखा आरोग्यास हानीकारक आहे. हे माहीत असूनही काही जण खर्रा खातात. यामुळं कॅन्सरसारखे दुर्धर आजारही होतात. खऱ्यामुळं तोंडाचा कर्करोग होता. हे सारे असूनही सडक्या सुपारीवर नियंत्रण आणण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. विदेशातील तार शोधण्यासाठी पोलिसांना आणखी किती वेळ लागेल, काही सांगता येत नाही. व्यापारी यामधून चांगले गब्बर होताना दिसून येतात. सडक्या सुपारीसाठी गोदामे भरून ठेवली जातात. त्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

गोंदियात धावती ट्रेन पकडता पकडता तोल सुटला; महिला पडणार एवढ्यात जवान आला मदतीला धावून…

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

Nagpur Crime | एकटी पाहून मध्यरात्री घरात घुसले; चाकूच्या धाकावर 58 वर्षीय महिलेवर दोघांकडून बलात्कार, नागपुरात चाललंय काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.