Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Lockdown | नागपुरात 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन, कसा असेल पोलीस बंदोबस्त?

नागपूर शहरात आज 15 मार्चपासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला. (Nagpur Lockdown corona cases)

Nagpur Lockdown | नागपुरात 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन, कसा असेल पोलीस बंदोबस्त?
Lockdown
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 11:07 AM

नागपूर : कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे नागपूर जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. नागपूर शहरात आज 15 मार्चपासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला. नागपुरात आज सकाळपासूनच लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. (Nagpur Lockdown corona cases)

नागपूर आजपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हेरायटी चौकात जाऊन लॉकडाऊनचा आढावा घेतला. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच नागपूर शहारीत सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

कडक कारवाई करण्यात येणार

नागपुरात अडीच हजार पोलीस शहरात तैनात करण्यात आले. तसेच दुचाकीवर दोन जण फिरताना फिरल्यास आणि चार चाकी वाहनात दोन पेक्षा जास्त लोक असल्यास वाहन जप्त करण्यात येईल. तसेच जे व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, त्यांना बोलून समजवण्यात येईल. त्याशिवाय जो कोणी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितलं आहे. (Nagpur Lockdown corona cases)

नागपूरमधील लॉकडाऊन कसा असेल?

?15 ते 21 मार्च दरम्यान कडक लॉकडाऊन

?शहरातील सीमा बंद , तपासणी करुन शहरात प्रवेश मिळेल

?शहरात 107 ठिकाणी नाकाबंदी

?2500 पोलीस कर्मचारी शहरात तैनात असतील

?राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या

?500 होमगार्ड

?रात्रीची 74 ठिकाणी नाकाबंदी

?शहरात पोलिसांचे 99 वाहने गस्त घालत राहणार

?विमान किंवा रेल्वे प्रवाशांना शहरात आल्यानंतर तिकीट दाखवावी लागेल

?विनाकारण शहरात येणाऱ्यांवर कठोर कारवाई

?मोटरसायकलवर फक्त एक जण जाऊ शकणार

?कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील

नागपूर कोरोना रुग्णांची सद्यस्थिती

नागपूर शहर परिसरात काल दिवसभरात 377 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे नागपूर शहरात एकूण 23 हजार 659 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर नागपूर महानगरपालिकेत 1976 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेत 1 लाख 49 हजार 888 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (Nagpur Lockdown corona cases)

संबंधित बातम्या :

ना बँडबाजा, ना जेवणाच्या पंगती, यवतमाळमध्ये अवघ्या 135 रुपयात शुभमंगल सावधान!

Nagpur Weekend Lockdown | नागपुरात शनिवार-रविवारी विकेंड लॉकडाऊन, नंतर 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन

Nagpur Lockdown: 15 मार्चपासून कडक निर्बंध, मात्र नागपुरातील लॉकडाऊनला भाजपचा विरोध

Nagpur Lockdown | नागपुरात लॉकडाऊन लावण्याची वेळ का आली? हा पाहा कोरोनाचा आलेख

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.