“अनिल देशमुख 14 महिने जेल का भत्ता खाके आया है”; वज्रमूठ सभेतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिलाच
मी 14 महिने आर्थर रोड जेलमध्ये असल्याचे सांगत अनिल देशमुख 14 महिने जेल का भत्ता खाके आया है, अब कोई माय का लाल अनिल देशमुख को रोक नहीं सकता असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
नागपूर : महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा नागपूरात होत असताना मविआतील नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी बेरोजगारी, महागाई, बेकारी आणि गुन्हेगारी या विषयावरून भाजपवर सडकून टीका करण्यात आली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी सांगितले की, मला खोट्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. यावेळी ज्यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप केला , तिच व्यक्ती न्यायालयात हजर राहिली नाही. ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांच्यामुळे मला 14 महिने आर्थर रोड जेलमध्ये राहावे लागले आहे. खोटे आरोप करणे हेच भाजपचे काम असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
मला खोट्या गुन्ह्याखाली फसवलं गेलं असल्याचे सांगत, माझ्यावर शंभर कोटी रुपयांचा आरोप केला गेला मात्र माझ्यावर झालेल्या शंभर कोटींच्या आरोपानंतर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना सांगितले की, चौकशी करा आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ज्यावेळी मात्र एक वर्षांने हायकोर्टाने जो निकाल दिला गेला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की, अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे ऐकीव माहितीच्या आधारावर आहेत, त्याचा कोणाताही पुरावा नाही. माझ्यावर एवढे आरोप झाले आहेत की, सादर केलेल्या चार्जशीटमध्ये 1 कोटी 71 लाखांचा उल्लेख करण्यात आला होता.
मात्र तो कुणीही सिद्ध करू शकले नाहीत असा टोलाही त्यांनी भाजपला लागवला. यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले की, माझ्यावर ज्याने आरोप केला तो देशाच्या बाहेर गेला होता. मी 14 महिने आर्थर रोड जेलमध्ये असल्याचे सांगत अनिल देशमुख 14 महिने जेल का भत्ता खाके आया है, अब कोई माय का लाल अनिल देशमुख को रोक नहीं सकता असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
अनिल देशमुख यांनी अवकाळी, गारपीटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कोणतीही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. आंबा, संत्री, मोसंबी, डाळींब उत्पादकांना अजूनही कोणतीच मदत सरकारने केली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
अतिवृष्टी होऊन सात-आठ महिन्या झाले त्यापूर्वी नुकसानग्रस्तांची पाहणी करून मदत देणार असल्याचे अश्वासन शिंदे-फडणवीस सरकारने दिले होते मात्र ते अश्वासन अजून पूर्ण झाले नाही असा टोलाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.