Nagpur Murders | नागपूर मार्चमध्ये रक्ताने माखले, महिनाभरात खुनाच्या 9 घटना; नातेवाईक, मित्रांनीच केला घात

दारुच्या नशेत दोन घटना घडल्या. तर कौटुंबीक वादातून (Family Disputes) तीन खून करण्यात आले आहेत. व्यवसायिक वादातून दोन खून झाले. फुटपाथवर झोपण्यावरून एका मजुराने दुसऱ्या मजुराला जीवानिशी ठार केले. तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या (Criminal Tendency) आरोपींने शुल्लक कारणातून एका युवकाला भोसकले.

Nagpur Murders | नागपूर मार्चमध्ये रक्ताने माखले, महिनाभरात खुनाच्या 9 घटना; नातेवाईक, मित्रांनीच केला घात
नागपूर - उप्पलवाडी येथील खुनाच्या घटनेचा तपास करताना पोलीस. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 2:22 PM

नागपूर : फेब्रुवारी महिना शांत होता. एकही खुनाची घटना नागपूर शहरात (Nagpur City) घडली नाही. पण, मार्च महिना रक्तपातात गेला. एक-दोन नव्हे तब्बल नऊ खुनाच्या घटना घडल्या. त्यामुळं शहर पुन्हा अस्वस्थ झाले आहे. या बहुतांश घटना या नातेवाईकांमध्ये असलेल्या वादातून झाल्या आहेत. दारुच्या नशेत दोन घटना घडल्या. तर कौटुंबीक वादातून (Family Disputes) तीन खून करण्यात आले आहेत. व्यवसायिक वादातून दोन खून झाले. फुटपाथवर झोपण्यावरून एका मजुराने दुसऱ्या मजुराला जीवानिशी ठार केले. तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या (Criminal Tendency) आरोपींने शुल्लक कारणातून एका युवकाला भोसकले.

दारूच्या नशेत मित्रांनीच संपविले

पहिली घटना वाठोडा पोलीस हद्दीत घडली. वाठोडा रिंगरोडजवळ जायस्वाल दारू भट्टी आहे. याठिकाणी राजू भगवानदास चेलीकसवाई (वय 35) याचा खून करण्यात आला. हा खून राजू दारूच्या नशेत असताना त्याच्या मित्रांनीच केला. अमन मेश्राम व अन्य मित्रांनी राजूचे डोकेच फोडले. ही घटना पाच मार्च रोजी घडली.

पतीने पत्नी-मुलीचा गळा कोयत्याने चिरला

दुसरी घटना एमआयडीसी पोलीस हद्दीतील राजीवनगर येथील आहे. कौटुंबीय कहलातून पत्नी व मुलीचा नवऱ्यानेच खात्मा केला. विलास गवते हा दूध विक्रेता. त्याने पत्नी व मुलगी झोपेत असताना कोयत्याने दोघींचाही गळा कापला. रंजना गवते (वय 36) व मुलगी अमृता गवते (वय 13) या दोघींचाही जीव गेला. या घटनेचे एमआयडीसी परिसर चांगलाच हादरला. ही दुहेरी खुनाची घटना बारा मार्च रोजी घडली.

भाऊ, आईनेच गळा घोटला

तिसरी घटना ही नंदनवर पोलीस हद्दीत घडली. नानोटे कुटुंबीय झोपडपट्टीत राहत होते. भावा-भावात वाद झाला. या वादाचं पर्यवसान खुनात झालं. शुभम नानाटे या युवकाचा त्याचा भाऊ नरेंद्र नानोटेनं गळा दाबून खून केला. त्याने आई रंजना नानोटे यांना सोबत घेतलं. भाऊबंदकीतून हा खून झाला.

व्यवसायिक वादातून खून

चौथी घटना कळमना आरटीओ कार्यालयासमोर घडली. पंधरा मार्चची दुपारची गोष्ट. टायर मोल्डिंगचं काम सुरू होतं. ऑटोचालक आणि टायर मोल्डिंगचं काम करणाऱ्यांमध्ये कामावरून वाद झाला. या वादात टायर मोल्डिंगचं काम करणाऱ्यानं भुऱ्या बनकर (वय 24) याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गळ्यावर वार झाल्याने भुऱ्या बनकर या ऑटोचालकाला अंतिम श्वास घ्यावे लागले. ही घटना पंधरा मार्च रोजी घडली.

फुटपाथवर झोपण्याच्या जागेवरील वादातून खून

पंधरा मार्चला आणखी एक खुनाची घटना घडली. पारडी चौकात रात्री झोपण्याच्या जागेवरून वाद झाला. एका मजुराने दुसऱ्या मजुराला झोपण्याच्या जागेवरून शिविगाळ केली. हा राग मनात ठेवून आरोपीने सोनू काशीराम बनकर हा रात्री झोपेत असताना गट्टू त्याच्या डोक्यावर मारला. सोनू घटनास्थळीच गतप्राण झाला. सीसीटीव्ही तपासातून या घटनेतील आरोपीचा शोध लागला.

गुन्हेगारी प्रवृत्तीतून युवकाची हत्या

कोतवाली पोलीस हद्दीत शिवाजीनगर आहे. या परिसरात सहावी घटना खुनाची घटना बावीस मार्च रोजी घडली. शुल्लक कारणातून मनीष यादव या पंचेवीस वर्षीय युवकाचा गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या आरोपींशी भांडण झाले. त्यांनी सरळ चाकूच काढला. या चाकूने मनीषला भोसकले. यात मनीषचा मृत्यू झाला.

दारूच्या नशेत मजुराचा खून

सातवी खुनाची घटना वाठोडा ठाण्याच्या हद्दीत घडली. बीडगाव येथील प्लास्टिक कारखान्यात मजुराचा खून करण्यात आला. सलीम ऊर्फ रिंकू परासिया (वय 31) असं मृतकाचं नाव आहे. दारूच्या नशेत अल्पवयीन साथीदारांनी सलीमच्या डोक्यावर दांड्याने प्रहार केला. यात सलीमचा जीव गेला. ही घटना 23 मार्च रोजी घडली.

बचत गटाच्या पैशाच्या व्यवहारातून हत्या

समर्थ नगरातील दीपा दास (41) स्कूल कंडक्टर होत्या. दीपा बचत गटाचे काम करून आर्थिक व्यवहार सांभाळायची. दीपाने सुवर्णाला एक लाख रुपये कर्जाच्या रुपात दिले होते. पैसे परत करण्यासाठी सुवर्णा व तिचे पती टाळाटाळ करत होते. यातून झालेल्या वादात सुवर्णा व तिच्या पतीने दीपाला संपविले. रागाच्या भरात सुवर्णाच्या पतीने दीपाचा गळा ओढणीने आवळला. मृत झाल्यानंतर तिचा मृतदेह उप्पलवाडीत नेऊन फेकून दिला होता.

भीम जयंतीनिमित्त मिरवणुका काढण्याची परवानगी द्या! Jaideep Kawade यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Bhandara Accident | कारधा पुलावर ट्रेलरची दुचाकीला धडक; काकू-पुतण्या ठार, सून जखमी

Nagpur Crime | प्रेमीयुगुल घरून पळाले, नातेवाईक शोधायला गेले, दोघांनीही विहिरीत उडी मारून संपविले

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.