पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर मेट्रोचं होणार लोकार्पण, 11 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करणार असून त्यासाठी आता पेंडॅाल सज्ज ठेवण्यात आले आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते नागपूर मेट्रोचं होणार लोकार्पण, 11 डिसेंबर रोजी नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 5:48 PM

नागपूरः नागपूर मेट्रोचं लोकार्पण आणि समृद्धी महामार्गाचंही लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याने 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यासाठीची तयारी आतापासूनच करण्यात येत आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गाचे प्रशासनाकडून 10 ते 15 हजार लोकं बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत असल्याने आता साऱ्या राज्यासह भाजपमधील नेत्यांच्या नजरा या कार्यक्रमाकडे लागून राहिल्या आहेत.

मागील काही महिन्यांपासून नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. ते काम आता झाले असून या दोन्ही कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या या दौऱ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर मेट्रो आणि समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करणार असून त्यासाठी आता पेंडॅाल सज्ज ठेवण्यात आले आहेत.

या पेंडॉलमध्ये किमान दहा ते पंधरा हजार लोकं बसू शकतील एवढ्या भव्य दिव्य आकारात हा पेंडॉल उभा करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावरील वायफळ टोलप्लाझा येथे लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी नागपूरसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत.

बांधकाम कंपनीकडून समृद्धी महामार्गाच्या सर्व टोलच्या हस्तांतरण पूर्ण करण्यात आले असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.