चार वर्षात एकही प्रश्न नाही, भाजपचे सर्वाधिक 52 नगरसेवक गप्प, नागपूर मनपात तब्बल 68 नगरसेवक ‘मौनी’

नागपूर महापालिकेतील 68 नगरसेवक मौनी नगरसेवक ठरले आहेत. या नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारलेला नाही. यात सर्वाधिक भाजपचे 52 तर काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत.

चार वर्षात एकही प्रश्न नाही, भाजपचे सर्वाधिक 52 नगरसेवक गप्प, नागपूर मनपात तब्बल 68 नगरसेवक 'मौनी'
नागपूर महापालिका
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 8:55 AM

नागपूर : नागपूर महापालिकेतील (Nagpur municipal Carporation) 68 नगरसेवक मौनी नगरसेवक ठरले आहेत. या नगरसेवकांनी गेल्या 4 वर्षात सभागृहात एकही प्रश्न विचारलेला नाही. यात सर्वाधिक भाजपचे 52 तर काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत. ज्या उद्देशानं नागरिक नगरसेवकांना निवडून देतात त्या उद्देशालाच या नगरसेवकांनी हरताळ फसलाय.

नागपूर महापालिकेत एकूण 151 नगरसेवक आहेत. प्रभागातील समस्या, प्रश्न सोडविण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला मतदार निवडून देत असतात. निवडून आलेल्या नगरसेवकांनी सभागृहात प्रश्न मांडून ते सोडवावेत, अशी सामान्य जनतेला अपेक्षा असते. मात्र, नागपूर महापालिकेतील 68 नगरसेवक असे आहेत ज्यांनी चार वर्षात सभागृहात तोंडच उघडलं नाही.

भाजपचे सर्वाधिक 52 मौनी नगरसेवक

चार वर्षात त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. याध्ये महापालिकेत सत्तापक्ष असलेल्या भाजपचे सर्वाधिक 52 नगरसेवक आहेत. त्याखालोखाल काँग्रेसचे 12 आणि बसपाचे 4 नगरसेवक आहेत. जनतेचे प्रश्न न मांडणाऱ्या आणि न सोडविणाऱ्या नगरसेवकांना पुन्हा पुन्हा तिकीटच देऊ नये, अशी मागणी आता होतेय तर पक्षाकडून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला जातोय.

राजकीय पक्षांचे आरोप प्रत्यारोप

भाजप गेल्या 15 वर्षांपासून महापालिकेत सत्तेत आहे. मात्र, तरीही शहरातील समस्या सुटल्या नाहीत, प्रश्न कायम आहेत. आम्ही खूप काम केलं, असा दावा भाजपकडून वारंवार केला जातो. मात्र, सभागृहात भाजपचे नगरसेवक मौन धारण करतात, त्यामुळं कुठलेही प्रश्न मार्गी लावत नाही, हे माहितीवरून दिसत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.

नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळं शहरातील प्रश्न अजूनही कायम

नागपूर उपराजधानीचं शहर असलं तरी शहराचा हवा तसा विकास झालेला नाही. काही नगरसेवकांच्या निष्क्रियतेमुळं शहरातील अजूनही प्रश्न कायम आहेत. त्यामुळं या नगरसेवकांनी मौन सोडून सभागृहात प्रश्न मांडने अपेक्षित आहे.

(Nagpur Municipal Corporation 68 corporators have not asked a single question in last four years)

हे ही वाचा :

Corona Update : 11 जिल्ह्यात एकही मृत्यू नाही, रुग्णसंख्येतही मोठी घट!

नागपूरमधल्या शाळांमध्ये लगबग सुरु; शिक्षकांचं लसीकरण, वर्गखोल्यांचं सॅनिटायझेशन, बेंचेसमध्ये ठराविक अंतर!

नागपूरच्या तांदूळ घोटाळ्यात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता, रेशन दुकानदार संघटना फडणवीसांच्या भेटीला

बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?
गोगावलेंचा 'कोट' रेडी, आज मंत्रिपदाची शपथ, कोणत्या खात्याची अपेक्षा?.
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?
आज मंत्रिमंडळ विस्तार, भाजप-शिवसेने अन् राष्ट्रवादीतून कोण घेणार शपथ?.
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...