नागपूर महापालिकेच्या परिवहन सभापती बंटी कुकडे बिनविरोध, भाजपकडून दुसऱ्यांदा संधी
भाजपनं बंटी कुकडे यांच्यावर विश्वास टाकत दुसऱ्यांदा परिवहन सभापती म्हणून जबाबदारी सोपवली आहे. गेल्या काही दिवसांपासू परिवहन सभापतीपदाची निवड रखडली होती.
नागपूर: नागपूर महानगर पालिकेच्या परिवहन सभापतीपदावर भाजप नगरसेवक बंटी कुकडे यांची निवड झाली आहे. भाजपनं बंटी कुकडे यांच्यावर विश्वास टाकत दुसऱ्यांदा परिवहन सभापती म्हणून जबाबदारी सोपवली आहे. गेल्या काही दिवसांपासू परिवहन सभापतीपदाची निवड रखडली होती.
भाजपकडून बंटी कुकडे यांना पुन्हा संधी
भाजप नगरसेवक बंटी कुकडे यांची एकमताने परिवहन सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपनं त्यांच्यावर विश्वास टाकत पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली आहे. बंटी कुकडे यांनी या आधी सुद्धा परिवहन सभापती म्हणून काम पाहिलं आहे.
बिनविरोध निवड
नागपूर महानगर पालिकेच्या परिवहन सभापती पदासाठी आज निवडणूक झाली. बंटी कुकडे यांची या पदासाठी एकमताने बिन विरोध निवड करण्यात आली. महत्वाचं म्हणजे या आधी सुद्धा बंटी कुकडे यांच्या कडेच या पदाची जबाबदारी होती , मात्र ही निवड अनेक दिवसांपासून रखडली होती त्याला आज मूर्त रूप मिळालं
इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवणार
नागपूर शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आणि शहरातील सार्वजनिक बस वाहतूक सुविधा जनक बनविण्याचा मानस असून शहरातील 340 बस आहेत त्या पैकी 80 बस सीएनजी कार चालत आहे आता सगळ्या बस सीएनजी आणि इलेक्ट्रिक करून शहर प्रदूषण मुक्त करण्याची मोहीम हातात घेणार असून शहरात आणखी इलेक्ट्रिक बस लावणार असल्याचं बंटी कुकडे यांनी सांगितलं
नागपूर विद्यापीठाच्या चुकीमुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूरच्या परीक्षा विभागाच्या चूकीमुळे विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. विद्यापीठाची परिक्षा देऊनही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत अनुपस्थित असल्याचा उल्लेख असल्यानं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. बीए अभ्यासक्रमाच्या 300 च्या वर तक्रारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडं दाखल झाल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील बीएच्या निकालामध्ये परीक्षा विभागाच्या चुकीमुळं विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढल्याचं समोर आलंय. विद्यापीठानं नुकताच निकाल जाहीर केल्यानंतर गुणपत्रीकेत अनुपस्थित दाखवल्याने विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढलं आहे. परीक्षा देऊनही गैरहजर दाखवल्यानं विद्यापीठाकडे बीएच्या अभ्यासक्रमाच्या 300 च्या वर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या या तक्रारींवर विद्यापीठ प्रशासन काय मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे.
इतर बातम्या:
कचरा संकलनासाठी QR कोड, नागपूर महापालिकेकडून प्रायोगिक तत्वावर सुरुवात, राज्यातील पहिला प्रयोग