नागपूर : मनपा निवडणुकीचे (Municipal Election) पडघम वाजू लागले आहेत. प्रभाग रचना जाहीर (Ward structure announced) झाल्याने उमेदवारीसाठी अर्ज वितरित केले जात आहेत. यासाठी पक्षांना अर्जाचे शुल्क हवे आहे. काँग्रेसने तीनशे रुपये अर्जची शुल्क ठेवली आहे. परंतु, अर्ज जमा करताना दहा हजार रुपये डिपॉझिट मागितले जात आहे. ही रक्कम पाहून काही गरीब कार्यकर्ते नाराज झाले आहे. काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष मग दहा हजारांचे कशाला हवे, असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या दोन दिवसात 270 इच्छुकांनी काँग्रेस भवनातून अर्ज घेतले. विधानसभानिहाय सहा टेबल लावण्यात आले आहेत. अर्ज भरून देवडिया भवनात (Devdia Bhavan) जमा करावयाचे आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 29 नगरसेवक निवडून आले होते. या नगरसेवकांना पुन्हा लढायचं असेल, तर अतिरिक्त पाच हजार रुपये लागत आहेत. देवडिया भवनात सायंकाळी पाच ते साडेसात वाजतापर्यंत अर्ज मिळत आहेत.
काँग्रेसनं उमेदवारी अर्ज वाटप प्रक्रिया सुरू केली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी देवडिया भवन सज्ज करण्यात आलंय. सोशल मीडियावर याचा प्रचारही सुरू झालाय.
आगामी नागपुर महानगर पालिका चुनाव के मद्देनजर नागपुर शहर (जिल्हा) कांग्रेस कमिटी कार्यालय देवड़िया कांग्रेस भवन में चुनाव लड़ने के इच्छुक उम्मीदवारों ने जहाँ आवेदन प्राप्त किए । वही दूसरी तरफ कांग्रेस कार्यकर्ताओं में जोश दिखाई दिया ।@INCMaharashtra @NANA_PATOLE @VikasThakreINC pic.twitter.com/jQv4wKFo4P
— Nagpur City Congress Social Media Cell (@Nagpur_SMC) February 22, 2022
बसपाने यंदा महापौर बनाओ अभियान सुरू केले आहे. पक्षाकडे अनेकांनी उमेदवारी मागितली. मनपावर निळे झेंडे फडकविण्यासाठी बसपा सज्ज झाली आहे. उमेदवारी अर्जासाठी बहुजन समाजवादी पक्ष दहा हजार रुपये आकारत असल्याची माहिती आहे. त्यामुळं काँग्रेसपेक्षा बसपाची उमेदवारी महाग असल्याचे बोलले जाते. शिवाय पक्षासाठी 25 हजार रुपये अतिरिक्त निधी मागितल्याची चर्चा आहे.
नागपूर मनपा निवडणूक एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 15 मार्चनंतर आचारसंहिता लागू शकते. या निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणासाठीच्या न्यायालयीन निकालाची प्रतीक्षा आहे. 26 फेब्रुवारीला ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाची शक्यता आहे. त्यानंतर वेगवान घडामोडी घडतील. दोन मार्चला अंतिम आराखडा निवडणूक आयोगाकडे जाईल. त्यानंतर दहा मार्चपर्यंत आरक्षण सोडत होईल. त्यामुळं आतापासूनच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. उभेच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.