नागपूर मनपा निवडणूक, तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द, न्यायालयात गेल्यास काय होणार?

नागपूर प्रभाग रचना नव्याने होणार असल्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली. राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या पेचामुळे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतलेत. जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द होणार आहे. शिवाय आक्षेपानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची आशाही मावळली आहे. मात्र, या प्रकरणात अनेक जण न्यायालयाचा दरवाजाही ठोठावू शकतात.

नागपूर मनपा निवडणूक, तीन सदस्यीय प्रभाग रचना रद्द, न्यायालयात गेल्यास काय होणार?
नागपूर महापालिकाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 1:45 PM

नागपूर : नागपूर मनपा निवडणुकीसाठी (Nagpur Municipal Corporation elections) राज्य शासनाचा अध्यादेश जारी झाला आहे. त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द (cancellation of three member ward structure) करण्यात आली आहे. आधीच नागपूर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. त्यात राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे अधिकार आपल्या नियंत्रणात घेण्यासंदर्भात विधिमंडळात विधेयक पारित केले. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राजपत्र जारी केले जाईल. यानुसार, त्रिसदस्यीय प्रभाग रचना रद्द करत नवी प्रभाग रचना घोषित करण्याचे अधिकार राज्य सरकरकडे ठेवण्यात आले आहेत. नव्या प्रदत्त अधिकारानुसार सरकारचं नव्या रचनेची प्रक्रिया पूर्ण करण्याची शक्यता आहे. यापूर्वी प्रभाग रचनेचे अधिकार राज्य निवडणूक आयुक्तांकडे होते. नव्या बदलात राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने राज्य सरकारने असा सोयीचा बदल केला आहे. तसेच नव्याने फेररचनेची चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाचे अधिकार काढून घेतल्याचा अध्यादेश काढला. त्यामुळं यावर काही जण न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणुकीसाठी सहा महिने काम

राजपत्रात आरक्षणाच्या मुद्दाबाबतही स्पष्ट करण्यात आले. राज्य निवडणूक आयुक्तांनी कुठल्याही निवडणुका अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि महिलांच्या आरक्षणाशिवाय घेऊ नयेत, असे म्हटले आहे. या आरक्षणात सर्व वर्गाच्या आरक्षणाची हमी द्यावी लागेल. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्यामुळेच सरकारने नवे विधेयक आणले आहे. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळं आता ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण देण्यास नकार दिला. मनपा निवडणुकीसाठी प्रशासनाने सहा महिने प्रक्रियेवर काम केले. सप्टेंबरपासून सुरू झालेल्या प्रभाग रचना मतदार यादी रचनेचे काम फेब्रुवारीत संपले.

एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होणार निवडणुका

नागपूर महापालिका निवडणुका तीन सदस्यीय वॉर्ड पद्धतीने होणार नाहीत. त्यामुळं एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीनं निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2017 च्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा भाजपला झाला. त्यामुळं महापालिकेत 151 पैकी 108 नगरसेवक भाजपचे निवडूण आले. हा बदल झाल्यास त्या पद्धतीची रणनिती राजकीय पक्षांना आखावी लागणार आहे.

गडचिरोलीत अवैध खंडणी वसुली, बोगस बंदुकधारी नक्षलवादी जेरबंद, काय आहे प्रकरण?

नागपूर शिवसेनेत मोठे फेरबदल, संजय राऊतांनी घातले लक्ष, आता दोन महानगरप्रमुख

विदर्भात थंडी संपली आता उन्हाचे चटके, पारा पोहोचला 38 अंशावर, हवामानाचा अंदाज काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.