पेट्रोल दरवाढीवर नागपूर महापालिकेचा उतारा, अधिकाऱ्यांच्या कार सीएनजीवर चालणार, बंटी कुकडेंची माहिती
पेट्रोलच्या महागाईवर नागपूर मनपाकडून अनोखा तोडगा काढण्यात आला आहे. परिवहन विभागाचे सभापती बंटी कुकडे यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.
नागपूर: पेट्रोलच्या महागाईवर नागपूर मनपाकडून अनोखा तोडगा काढण्यात आला आहे. परिवहन विभागाचे सभापती बंटी कुकडे यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. मनपा अधिकाऱ्यांच्या गाड्या सीएनजीवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन सभापती बंटी कुकुडे यांनी त्यांची सीएनजीवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नागपूर महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या 40 पेक्षा जास्त कार सीएनजीवर धावणार आहेत. परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
अधिकाऱ्यांच्या सर्व कार सीएनजीवर चालणार
पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त शहर व्हावं, म्हणून नागपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या सर्व कार आता सीएनजीवर करण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी स्वताची कार सीएनजीवर केलीय.
पहिल्या टप्प्यात 40 कार सीएनजीवर चालणार
नाहपूर महापालिकेतील 40 अधिकाऱ्यांच्या कार सीएनजीवर कन्व्हर्टर करण्यात येणार, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेतील परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिलीय. यातून महानगरपालिकेच्या पैशाची मोठी बचत होईल, असं त्यांनी सांगितलं.
बंटी कुकडे यांची परिवहन सभापतीपदी दुसऱ्यांदा निवड
नागपूर महानगर पालिकेच्या परिवहन सभापतीपदावर भाजप नगरसेवक बंटी कुकडे यांची निवड झाली आहे. भाजपनं बंटी कुकडे यांच्यावर विश्वास टाकत दुसऱ्यांदा परिवहन सभापती म्हणून जबाबदारी सोपवली आहे. गेल्या काही दिवसांपासू परिवहन सभापतीपदाची निवड रखडली होती. भाजप नगरसेवक बंटी कुकडे यांची एकमताने परिवहन सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे. भाजपनं त्यांच्यावर विश्वास टाकत पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली आहे. बंटी कुकडे यांनी या आधी सुद्धा परिवहन सभापती म्हणून काम पाहिलं आहे.
बिनविरोध निवड
नागपूर महानगर पालिकेच्या परिवहन सभापती पदासाठी ऑगस्ट महिन्यात निवडणूक झाली होती. बंटी कुकडे यांची या पदासाठी एकमताने बिन विरोध निवड करण्यात आली. महत्वाचं म्हणजे या आधी सुद्धा बंटी कुकडे यांच्या कडेच या पदाची जबाबदारी होती , मात्र ही निवड अनेक दिवसांपासून रखडली होती त्याला आज मूर्त रूप मिळालं.
इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवणार
नागपूर शहराला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आणि शहरातील सार्वजनिक बस वाहतूक सुविधा जनक बनविण्याचा मानस असून शहरातील 340 बस आहेत त्या पैकी 80 बस सीएनजी कार चालत आहे आता सगळ्या बस सीएनजी आणि इलेक्ट्रिक करून शहर प्रदूषण मुक्त करण्याची मोहीम हातात घेणार असून शहरात आणखी इलेक्ट्रिक बस लावणार असल्याचं बंटी कुकडे यांनी सांगितलं होतं.
इतर बातम्या:
Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगतचा ‘गोल्डन पॉईंट’ पॅराबॅडमिंटनमध्ये भारताला सुवर्ण पदक
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; चौकशी समिती बदला, खासदार नवनीत राणा नरेंद्र मोदींना पत्र लिहिणार
Nagpur Municipal Corporation Transport Committee Chairman Bunty Kukade said forty cars transferred to CNG due to petrol price hike