Nagpur Murder: अनैतिक संबंधात पतीचा अडसर! मुलीच्या मदतीनं पतीची गळा आवळून हत्या करत आत्महत्येचा कांगावा

Murder Mystery: धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना सुरुवातीला या हत्याप्रकरणाचा कोणताही अंदाज नव्हता. सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणी आत्महत्येचा कांगावा करण्यात आला होता.

Nagpur Murder: अनैतिक संबंधात पतीचा अडसर! मुलीच्या मदतीनं पतीची गळा आवळून हत्या करत आत्महत्येचा कांगावा
पत्नीच्या हत्येची साक्ष देण्यासाठी गेलेल्या पतीची न्यायालयाच्या आवारात गोळ्या घालून हत्या Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 8:19 AM

नागपूर : नागपूरमध्ये हत्येचा (Nagpur Murder) धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हत्या करुन आत्महत्येचा कांगावा करण्यात आल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण चौकशीतून समोर आलंय.पाच दिवसांच्या पोलीस तपासानंतर (Police investigation) खळबळजनक माहिती समोर आली. आत्महत्येचा (Suicide) कांगावा करुन हत्या करणाऱ्या आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फोल ठरला. पोलिसांना चकवा देत आपल्या गुन्ह्यापासून लांब पळणाऱ्यांना आरोपींना अखेर नागपूर पोलिसांनी अद्दल घडवली आहे. एका महिलेनं आपल्याच पतीची हत्या केली. गळा आवळून पतीची हत्या करणाऱ्या महिलेनं आपल्या मुलीलाही पतीच्या हत्येचा कट रचताना सामील करुन घेतलं. पाच दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना नागपुरात घडली. हत्येच्या या घटनेत पत्नीनं आपल्या अल्पवयीन मुलीचीही मदत घेतली असल्याचं पोलिसांच्या तपास समोर आलंय.

दोघांनाही अटक…

नागपूर पोलिसांनी या हत्येप्रकरणी दोघींना ताब्यात घेतलंय. पतीची गळा आवळून हत्या करणाऱ्या महिलेचं नाव निशा गजभिये असं आहे. तर या हत्याप्रकरणात सहभागी असलेल्या निशाची मुलगी अल्पवयीनं आहे. त्यामुळे या अल्पवयीन मुलीची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव धमेंद्र गजभिये असं आहे. धमेंद्र ट्रकचालक होता. त्याला अंमली पदार्थांचं व्यसनही लागलेलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे.

…म्हणून गळा आवळून हत्या!

धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांना सुरुवातीला या हत्याप्रकरणाचा कोणताही अंदाज नव्हता. सुरुवातीला या संपूर्ण प्रकरणी आत्महत्येचा कांगावा करण्यात आला. मात्र पोलिसांच्या संशयानं अनेक प्रश्नांची उकल केली. नेमकी ही हत्या आहे की आत्महत्या आहे, या संशयातून पोलिसांनी तपास सुरु केला. त्यातून खळबळजनक खुलासा करण्यात आला.

अनैतिक संबंधात निशाला धर्मेंद्रचा अडथळा येत होता, असं सांगितलं जातंय. त्यातून निशानं आपल्या मुलीच्या मदतीनं हत्येचा कच रचला. यानंतर अल्पवयीन मुलीच्या मदतीनंच निशाने पती धर्मेंद्रचा गळा आवळून खून केलाय. दरम्यान, आता या हत्येप्रकरणी निशाला अटक करण्यात आली असून पोलिसांकडून तिची कसून चौकशी केली जाते आहे.

संबंधित बातम्या :

Lady Conductor Murder | नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक

नागपुरात 23 वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, शेजारी पेट्रोलची रिकामी बाटली

नागपुरात त्रिकोणी कुटुंबाचा दुःखद अंत, पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने आयुष्य संपवलं

महत्त्वाची बातमी : नाशिकमध्ये कार अपघात, पाच वर्षांच्या मुलावर काळाचा घाला

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.