भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय, पण…; नाना पटोले यांचा थेट हल्लाबोल

Nana Patole on BJP Maharashtra and Chhatrapati Shivaji Maharaj : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला भाजप बरबाद करतंय..., असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. तसंच इतर मुद्द्यांवर पटोले काय म्हणाले? वाचा...

भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय, पण...; नाना पटोले यांचा थेट हल्लाबोल
Nana Patole
Follow us
| Updated on: Dec 14, 2023 | 10:47 AM

नागपूर | 14 डिसेंबर 2023 : महाराष्ट्र पेटवून भाजपला काय प्राप्त होतं आहे? समजत नाही. सरकार कसं पाप करत आहे. मंत्रीच सांगत आहेत. महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका यांनी घेतली आहे. आज राज्यात शासकीय व्यवस्था कोलमडली आहे. सरकारी कर्मचारी, परिचारिका संपावर आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे. सर्व समाजाचे शेतकरी आहेत. पण सरकारला जनतेचं काहीही पडलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी उत्तर देणार? ते समजत नाही. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. शिवरायांचा महाराष्ट्र पेटवला जात आहे. तो शांत केला पाहिजे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

“सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलंय”

राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज्य सरकारमध्ये काय चाललं आहे? यांनी महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका घेतली आहे. आज सरकारी व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्र बरबाद करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झालंय. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसावर चर्चा संपली. मुख्यमंत्री उत्तर देतील असे कळत होते पण त्यांनी अजून उत्तर दिलं नाही. उद्या उत्तर देणार असं कळतंय. या लोकांनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय, असं म्हणत पटोलेंनी घणाघात केलाय.

पोटनिवडणुकीवर पटोले म्हणाले…

कोणत्याची लोकप्रतिनिधीचा मृत्यू होतो. तर तिथे पोट निवडणूक घेतली पाहिजे. पण केंद्र सरकारच्या दबावात येऊन निवडणूक आयोग निर्णय घेत नाही. म्हणून न्यायालयाने यांना फटकारलं आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.

“आज मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार”

पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती आहे. जे आरोप केले जात आहेत. त्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. आज मी लेखी स्वरूपात सर्व पुरावे मुख्यमंत्री शिंदे यांना देणार आहे. आयुक्तांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असंही नाना पटोले म्हणालेत.

Non Stop LIVE Update
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.