पुतण्याचा काकावर पुन्हा शाब्दिक वार; अजितदादा बोलले ते चूकच!, जाहीर निषेध, रोहित पवार आक्रमक

MLA Rohit Pawar on Ajit Pawar Statement : पुतण्याचा काकावर पुन्हा शाब्दिक वार... रोहित पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका. अजितदादा बोलले ते चूकच!, जाहीर निषेध, आक्रमक होत रोहित पवार यांचा निशाणा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबतही रोहित पवारांनी मोठं विधान केलंय.

पुतण्याचा काकावर पुन्हा शाब्दिक वार; अजितदादा बोलले ते चूकच!, जाहीर निषेध, रोहित पवार आक्रमक
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 11:06 AM

नागपूर | 12 डिसेंबर 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून रोहित पवार आणि अजित पवार या काका पुतण्यामध्ये राजकीय लढाई सुरु झाली. रोहित पवार आक्रमकपणे अजित पवार यांच्या विरोधात बोलताना दिसतात. आताही अजित पवार यांच्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राष्ट्रवादीचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शाब्दिक वार केला आहे. अजित पवार यांनी पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं विधान चुकीचं आहे. जाहीर निषेध त्यांच्या विधानाचा जाहीर निषेध करतो, असं रोहित पवार म्हणालेत.

अजित पवार काय म्हणाले?

पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार एक विधान केलं. याची सध्या प्रचंड चर्चा होत आहे. पीएचडी करून तरूण मुलं करतात काय? काय दिवे लावतात?, अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली. त्यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांचा शाब्दिक वार

युवकांवर कुणी शंका घेता कामा नये. पीएचडी करणारी मुलं कोण आहेत? तर ही गरिबाची मुलं आहेत. पीएचडीसाठी जो वेळ लागतो. त्यासाठीचा पैसा या मुलांकडे नाही. त्यामुळे ते सरकारकडे येत असतील. सरकारची मदत घेत असतील. तर त्यात चूक काय? एखादा श्रीमंताचा मुलगा असता तर तो सरकारकडे आला असता का? ज्या मुलांकडे क्षमता आहे, बुद्धिमत्ता आहे. पण पैसा नाही, म्हणून ही मुलं सरकारच्या स्कॉलरशीपवर शिकत असतील. तर त्यात काहीही चूक नाही. त्यावर कुणी शंका घेऊ नये. अजितदादा जे बोलले त्याचा निषेध मी करतो, असं रोहित पवार म्हणाले.

राम शिंदेंवर टीका

राम शिंदे यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. नीरव मोदीने त्यांच्या आमदाराकीच्या काळात जमीनी विकत घेतल्या होत्या.मग त्यांनी पासे खाल्ले असं म्हणायचं का ? राम शिंदे यांच्यावर टीका करण्यात मला रस नाही. आम्हाला त्यांच्यासारखं भाड्याने माणसे आणावी लागत नाही. युवा वर्ग आमच्यासोबत आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं.

सुनावणी संपण्यापुर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देतील, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसंच या सगळ्यामुळे शिवसैनिकांना न्याय मिळणार नाही, असं रोहीत पवार म्हणालेत.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.