नागपूर : एक अत्यंत फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार आमि लाळघोटेपणा करणार उपमुख्यमंत्रीपदी मिळाला, म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतो आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले की, अडीच वर्षांचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर फडतूस कोण आहे, हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.
खरं म्हणजे दोन दोन मंत्री जेलमध्ये असताना त्यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतान दाखवत नाहीत.
आणि हे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांचे लाळघोटपणा करत होते, जे वाझेच्या मागे लाळ घोटतात त्यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार काय आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना यांच्या कार्यकाळात पोलीस शोषण करतात त्यांना बोलण्याचा व ज्यांच्या काळात अडीच वर्षे घरी असणाऱ्यांनी आम्हाला राजकारण शिकवू नये असं म्हणत त्यांनी जर आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भूई थोडी होईल असा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं आहे.
आम्ही संयमाने वागणारी लोकं आहोत, याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असं नाही. ज्या दिवशी बोलणं सुरु करु त्या दिवशी पळता भूई थोडी होईल. त्यामुळे संयमाने बोला असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी आमच्या जरी टीका केली तरी त्यांचा थयथयाट आणि त्यांच्या फ्रस्टेशनला उत्तर देण्याचं कारण नाही अशा शब्दात
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी हेही उत्तर दिले पाहिजे की, मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि खुर्चीसाठी विरोधकांची लाळ घोटता.
मग खरा फडतूस कोण असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे कोणत्याही भाषेत बोलले असले तरी त्यापेक्षा खालची भाषा मला येते.
कारण मी नागपूरचा आहे. मात्र मी तसं बोलणा नाही, कारण तशी बोलण्याची माझी पद्धत नाही अशी त्यांच्यावर त्यांनी सडकून टीकाही केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर त्यांनी टीका केली असली तरी मी येवढंच सांगतो, याचं उत्तर त्यांना जनता देईल अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
पाच वर्षे मी गृहमंत्री राहिलो आहे. आता पुन्हा गृहमंत्री आहे. मी गृहमंत्री राहिल्यामुळे अनेक लोकांना अडचणी येत आहे. ते पाण्यात देव ठेऊन बसलेय आहेत की मला गृहमंत्रीपद कसं सोडावं लागेल.
पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही असा पलटवारही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. कारण जो जो चुकीचं काम करेल त्याला जेलमध्ये टाकण्याचं काम करणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.